शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत उपस्थितीसाठी शिक्षकांची कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 11:57 IST

Corona test of teachers शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल शाळा व्यवस्थापनाला द्यावा लागणार आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : इयत्ता ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळांतील सर्व शिक्षकशिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणीचा अहवाल शाळा व्यवस्थापनाला द्यावा लागणार आहे. शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शाळांमध्ये ९ ते १२ पर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहेत. विद्याथ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. पालकांच्या संमतीनेच विद्यार्थी शाळेत येतील.  शाळेतील परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा व इतर कार्यक्रम घेण्यावर बंदी आहे. शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत मास्क घालून येणे बंधनकारक  आहे.  शाळा तीन तास भरविण्यात येईल. शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजना थर्मलगन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी आदि सुविधा शाळेत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शाळेची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे लागणार आहेत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे. शाळेत आपत्कालीन गट, स्वच्छता, पर्यवेक्षण गट स्थापन केले जाणार आहेत. वर्गखोली तसेच शिक्षक स्टाफरूम मधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार असावी. वर्गामध्ये एका बाकावर एकच विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकाच्या संमतीवरच अवलंबून आहे. शाळांनी इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय शिकण्यावर भर द्यावा, असेही पत्रकात नमूद आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकkhamgaonखामगाव