शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात सहा हजार शिक्षकांची कोरोना चाचणी, १८  पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 12:38 IST

Covid Test Of Teachers बाहेरगावी असलेल्या ७३९ जणांची अद्याप चाचणी होवू शकलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नऊ ते १२ वी ला शिकविणाऱ्या जिल्ह्यातील ६,०८४ शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी आतापर्यंत करण्यात आली असून यापैकी १८ जण कोरोना बाधीत आढळून आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील  ९ ते १२ मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १६ हजार ५३४ आहे. दरम्यान, जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची संख्या ६७५ आहे. १७ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील शिक्षकांची शाळा सुरू होण्याचे संकेत मिळताच युद्धपातळीवर काेरोना चाचणी (आरटीपीसीआर) करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व नॉन टिचींग स्टाफचा समावेश आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने प्रतीबंधीत क्षेत्र वगळता अन्य भागातील या शाळा सुरू होणार आहेत.  दरम्यान शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेवून पालकांची लेखी संमती गेवूनच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने शाळेची स्वच्छता, निर्जंतुकीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यासोबतच वर्गखोली तसेच स्टाफ रुममधील बैठक व्यवस्था ही शारीरिक अंतराचे नियम पालन करूनच करण्यात यावी, अशाही सुचना देण्यात आलेल्या आहेत. एका बाकावर एकच विद्यार्थी बसले व नावानीशी त्याची बैठक व्यवस्था होईल, अशी सुविधा करणे क्रमप्राप्त असल्याचे जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट केले गेले आहे. सोबतच शाळेमध्ये दर्शनी भागात शारीरिक अंतर पाळण्यासोबतच, मास्कचा वापर करण्याबाबत सुचना दिल्या गेल्या आहेत. जिल्ह्यातील ६०८४ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली असली तरी बाहेर गावी असलेल्या ७३९ जणांची अद्याप चाचणी होवू शकलेली नाही. तसेच मोताळा व खामगाव तालुक्याची कोरोना चाचणी संदर्भातील माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

थुंकण्यावरील प्रतिबंधाची कडक अंमलबजावणीशाळेच्या परिसरात थुंकण्यावरील बंदीच्या नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. यासोबतच शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरीता किमान सहा फुट इतके शारीरिक अंतर राखले जाईल याकरीता विशिष्ट चिन्हे जसे की चौकोन, वर्तुळ आखून ठेवलेले असावे. तसेच शाळेत जाण्या-येण्यासाठीचे दोन्ही मार्ग वेगवेगळे असावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षक