शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

मलकापूरमध्ये कोरोना संसर्गाचा ‘डाऊनफॉल’ सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:12 AM

तब्बल ३० टक्के रुग्ण ऐकट्या मलकापूर तालुक्यात सापडत होते ते प्रमाण आता १५ टक्क्यांवर आल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मलकापूर तालुक्यातील कोरोना संसर्गाचा डाऊनफॉल सुरू झाला असून आधी जिल्ह्यातील तब्बल ३० टक्के रुग्ण ऐकट्या मलकापूर तालुक्यात सापडत होते ते प्रमाण आता १५ टक्क्यांवर आल्याचे चित्र आहे.सध्या तालुक्यात १७ अ‍ॅक्टीव कोरोना रुग्ण असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७९ आहे. पैकी ८२ टक्के रुग्ण बरे झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्याच्या तुलनेत मलकापूर तालुक्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. परिणामी मधल्या काळात प्रशासकीय पातळीवर पालकमंत्र्यांनी सर्व यंत्रणांची बैठक घेवून काही कडक निर्देश दिल्यानंतर यंत्रणामधील समन्वय वाढला असून त्याचा परिपाक म्हणजे येथील कोरोना ससंर्ग तुर्तास तरी नियंत्रणात आला असल्याचे निदर्शनास येत आहे. २८ जून रोजीची स्थिती पाहता जेथे ११ टक्क्यांच्या आसपास असलेले कोरोना रुग्ण दगावण्याचे प्रमाण आता ८टक्क्यावर आले आहे. हा ही तालुक्याच्या दृष्टीने एक दिलासा म्हणावा लागले.पोलिस, महसूल, आरोग्य आणि जिल्हा परिषदेच्या सर्व्हेक्षण करणाऱ्या पथकांमधील आपसी समन्वय आता बºयापैकी साधल्या गेला असून हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्तींवर प्रभावी व त्वरित इलाज करण्यास प्राधान्य दिल्यागेल्यामुळे येथील कोरोना संसर्गाचे प्रमाण हे १५ टक्क्यांनी कमी झाले आहे.

सध्या मलकापूरमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाही परिणाम यावर झाला असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा पोलिस अधिक्षकांनीही दोन दिवसापूर्वी येथे भेट देवून एकंदरीत परिस्थितीची पाहणी केली होती, असे सुत्रांनी सांगितले.दुसरीकडे येथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले असून कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्काती लोकांचे टेस्टींग वाढविण्यासही प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनीही येथे दोन दिवसापूर्वी भेट देवून एकंदरीत स्थितीची पाहणी केली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

मृत्यूदर घटलामलकापूर तालुक्यात जेथे ११ टक्के मृत्युदर होता तो आता ८ टक्क्यांवर आला आहे. सोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अद्यापही एक दोन व्यक्तींना त्रास होत असला तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. तीन जुलै रोजी मलकापूरमधील चार कोरोना बाधीत रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे १२ अ‍ॅक्टीव रुग्ण आहेत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMalkapurमलकापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या