शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

अनलॉकनंतर बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 11:00 IST

केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.

- विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असले तरी लॉकडाऊन काळात काही प्रमाणात आटोक्यात असलेल्या कोरोनाने लॉकडाऊन उघडताच डोके वर काढले आहे. ३० मार्च ते ३० मेपर्यंत तीन महिन्यात जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. तर केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्णांची वाढ झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर २३ मार्चपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली. तेव्हापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद होते. तसेच नागरिकांमध्येही प्रचंड भीती होती. पोलिसांकडूनही चांगलाच ‘प्रसाद’ मिळत होता. त्यामुळे बाहेर गर्दी होत नव्हती. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण नियंत्रणात होते. पहिल्या लॉकडाऊननंतर दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळेस जिल्ह्यात प्रशासन थोडे सैल झाले. मार्च महिन्यापासून तर ३० मेपर्यंत जिल्ह्यात ६९ रूग्ण होते. त्यानंतर लॉकडाऊन उघडण्यात आला. लॉकडाऊन उघडल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.केवळ २४ दिवसांमध्ये १०० रूग्ण वाढले असून, सध्या जिल्ह्यात १६९ रूग्ण आहेत. लॉकडाऊननंतर जिल्ह्यात घाटाखाली मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मलकापूर तालुक्यात ६३ रूग्ण आहेत. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मलकापूरात २७ मे पासून तर ३० मेपर्यंत १२ रूग्ण आढळले. त्यानंतर जून महिन्यामध्ये ५० रूग्ण आढळले. तसेच पातूर्डा गावात १७ रूग्ण आढळले आहेत.पातुर्ड्यामध्ये पहिला रूग्ण ९ जून रोजी आढळला होता. लॉकडाऊन काळात या गावात एकही रूग्ण नव्हता.जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये वाढ होण्याकरिता बाहेर राज्यातून तसेच बाहेर जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरीत मजूर व नागरिकही कारणीभूत ठरले आहेत. जिल्ह्यात तब्बल १ लाख ३ हजार नागरिक बाहेरून आले.घाटावरील पाच तालुके कोरोनामुक्त तर घाटाखालील एकही नाहीजिल्ह्यातील सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली व देऊळगाव राजा हे पाच तालुके कोरोना मुक्त आहे. तर घाटाखालील एकही तालुका सध्या कोरोनामुक्त नाही. घाटाखालील खामगावमध्ये १, मलकापूरमध्ये ६३, जळगाव जामोदमध्ये २, नांदुरा २, शेगाव २ तर संग्रामपूर येथे सध्या तीन अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. जिल्ह्यात कोरोना संसगार्मुळे पाच जणांचा मृत्यू झाला असून चार जण घाटाखालील आहेत.

अनलॉक झाल्यानंतर रूग्ण वाढले आहेत. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. फिजीकल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन व्हायलाच हवे. तसेच मास्क वापरणे आवश्यक आहे. हात वारंवार धुतल्यास कोरोनाचा धोका कमी आहे.- डॉ. नीलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी, खामगाव

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याkhamgaonखामगाव