पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा १११, सुंदरखेड २, सागवान ३, धाड ४, माळवंडी १०, माळविहीर २, नांद्राकोळी २, येळगाव २, इजलापूर २, जनुना ११, खामगाव ६६, टेंभुर्णा ५, सुटाळा ३, भंडारी ६, शिरसोळी ३०, वडनेर ३, चांदूरबिस्वा ३, डिघी ३, बरफगाव ७, विटाळी ६, मलकापूर ६७, आळंद ५, कुंड खु. ९, चिखली ४३, अमोना २, पेठ १०, किन्ही नाईक ३, अमडापूर ४, मेरा बु. १०, उंद्री ४, करवंड २, अंबाशी २, अंत्री खेडेकर ३, डोंगर शेवली ३, मलगी ४, मंगरुळ नवघरे ३, सवणा ३, किन्ही सवडत २, मलगणी २, सिं. राजा १७, दुसरबीड २, कि. राजा ४, शेंदुर्जन २, पिंपळगाव लेंडी २, खैरखेड २, वडगाव खैरी २, डिडोळा बु. ३, धा. बढे ९, रोहिणखेड २, शेलापूर २, तपोवन २, वाघजळ २, खामखेड ३, थड २, खडकी २, मोताळा १८, शेगाव ३५, वानखेड ५, दुर्गादैत्य ६, जळगाव जामोद ६, आसलगाव ५, उमापूर १८, दे. राजा १४, अंढेरा २, वाकी २, सिनगाव जहागीर २, खैरव २, लोणार २, बिबी १०, कारेगाव २, शारा ३, मेहकर ८, शहापूर २, अकोला ठाकरे ३, जानेफळ ३, सावळा ७, ब्रह्मपुरी ५, लोणी गवळी ५, नांदुरा १५, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील एक, अकोला जिल्ह्यातील लोहारा १, जळगाव जिल्ह्यातील रावेर एक, जळगाव एक, नागपूर येथील एक आणि अमरावतीमधील एकाचा यात समावेश आहे. बुलडाणा शहरालगतच्या सुंदरखेड येथील जयनगरमधील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३७३ जणांनी कोरोनावर मात केली.
बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पार
जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा आता ३० हजारांच्या पार केला असून त्यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ४५७ झाली आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ४१४ झाली आहे. अद्यापही ४ हजार ३९५ जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २३६ जणांचा मृत्यू झाला आहे.