शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने मृत्यू, माहिती दडवली; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 10:34 IST

हे कुटूंब मुळचे नरवेल येथील असून, ते मुंबई येथे वास्तव्यास होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनरवेल / मलकापूर : वडीलांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती लपवून ठेवणाऱ्या कुटुंबातील सहा जणांना गुरुवारी बुलडाणा येथे हॉस्पिटल कारंटीन केले. याप्रकरणी मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बुलडाणा कोविड रुग्णालयात क्वारंटीन करण्यात आले आहे. हे कुटूंब मुळचे नरवेल येथील असून, ते मुंबई येथे वास्तव्यास होते. गावातील सजग नागरिकाने हे वास्तव समोर आणले.संत मुक्ताबाई चाळ रोड नंबर ३४ वागळे इस्टेट जिल्हा ठाणे येथे वास्तव्य असलेल्या एका इसमाला सर्दी, ताप, खोकला व श्वास घेण्याचा त्रास होत असल्याच्या कारणास्तव कळवा जि. ठाणे येथील रुग्णालयात ७ मे रोजी भरती केले होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा ९ मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृतकाच्या मुलाने व कुटुंबातील सदस्यांनी पित्याचा अंत्यविधी घाईघाईने उरकत एका ट्रकद्वारे मलकापूरची वाट धरली. प्रवास सुरू असताना वाटेतच ‘तुमच्या पित्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह’ आल्याची बाब संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून मृतकाच्या मुलाला भ्रमणध्वनीद्वारे कळविली होती. असे असतानाही ही बाब त्या परिवारातील सदस्यांनी लपवून ठेवत मलकापूर गाठले.येथे आल्यावर स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होम क्वारंटीन करवून घेतले. नरवेल येथील एका नागरिकाला वास्तव परिस्थिती कळताच त्याने प्रशासनाला सजग केले.या बाबीची तत्काळ दखल घेत नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद माळी यांनी गावात जाऊन त्या कुटुंबातील १ पुरुष, ३ महिला तथा २ पाच वर्षीय बालक असे एकूण ६ सदस्यांना ताब्यात घेत बुलडाणा येथे हॉस्पिटल क्वारंटीन केले. या कारवाईमुळे लपवून ठेवलेली वास्तव माहिती उघड झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये ‘गुन्हा दाखल’नरवेल: ९ मे रोजी कळवा जि. ठाणे येथे मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले कुटुंबीय १२ मेरोजी ठाण्यावरून नरवेलला आले; परंतु आल्यावर त्यांनी माहिती न दिल्याने म्हैसवाडीचे पोलीस पाटील योगेश मधुकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंविच्या कलम १८८,२६९,२७०,२७१ सह कलम ३ साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, सन १८९७ सह कलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ सह कलम कोवीड १९, उपायोजना नियम २०२० नियम ११ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास दसरखेड एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एफ. सी. मिर्झा यांच्या मार्गदर्शनात एएसआय लहू सोनवणे करीत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMalkapurमलकापूर