शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर ‘कोरोना’चे संकट; आठवडाभरात ९ पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:05 IST

आठ दिवसात नऊ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही क्वारंटीन करण्यात आले आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतानाच कोरोना विरोधातील लढ्यात ‘फ्रन्ट वॉरियर’ची भूमिका निभावणारे पोलिसही कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. आठ दिवसात नऊ पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, पिंपळगाव राजा व डोणगाव पोलीस स्टेशनच क्वारंटीन करण्याची वेळ आली.पोलीस दलातील संपूर्ण बंदोबस्त हा कोरोना लढ्यात कोरोना योद्ध्याच्या भूमिकेत असल्याने जिल्ह्यातील जवळपास दोन हजारांवर पोलीस कर्मचारी कोरोना विरोधातील लढ्यात अग्रेसर भूमिका निभावत आहेत. परिणामी कोरोनाचा धोका सर्वप्रथम पोलिसांनाच होता; मात्र गत १२० दिवसात पोलीस कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित होते; मात्र गत आठ दिवसात पोलीस कर्मचाऱ्यांनाचकोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्ह्यातील पिंपळगाव राजा व डोणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्ती तथा कुटुंबीयांसह जवळपास १०० जणांना क्वारंटीन करण्याची वेळ आली आहे. पिंपळगाव राजा व डोणगाव पोलीस ठाण्यातील जवळपास प्रत्येकी चार पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. २५ जुलै रोजी घेतलेल्या अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये डोणगाव पोलीस ठाण्यातील एकूण चार जण पॉझिटिव्ह आले आहेत; मात्र या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांना क्वारंटीन करण्यात आले आहे.कोरोनाच्या लढ्यात पोलीस दलातील जवळपास दोन हजारांवर कर्मचारी गुंतलेले असल्याने अन्य कामासाठीही तुलनेने मनुष्यबळ उपलब्ध करणे पोलीस प्रशासनास जिकरीचे झाले आहे; मात्र त्या उपरही कोरोनाचा संसर्ग होण्याचा स्त्रोत शोधून काढण्यात बुलडाणा पोलीस अग्रेसर असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी वापरण्यात येणाºया पंचसुत्रीमध्ये तथा प्रतिबंधित क्षेत्राचे सिमांकन करण्यामध्ये पोलिसांची महत्त्वाची आहे.

डोणगाव पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाºयांची तपासणी करण्यात येत असून, अ‍ॅन्टीजेन टेस्ट सोबतच आरटीपीसीआर टेस्टही आम्ही करणार आहोत. कुटुंब प्रमुख म्हणून या कर्मचाºयांच्या आपण संपर्कात आहोत. कोरोना प्रतिबंधाच्या लढ्यात पोलीस अग्रेसर आहेत.-डॉ. दिलीप पाटील भुजबळ,जिल्हा पोलीस अधीक्षक बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस