शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

विवाह सोहळ्यांंच्या मंगल सनईत ‘कोरोना’ चा बेसूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 11:24 IST

मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणाऱ्या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजानेफळ : कोरोना विषाणूमुळे लग्न सोहळ्याचे मंगलमय सूर बेसूर झाले असून मंगल कार्यालय व लॉन्सचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगल कार्यालय व्यवसायाशी निगडित असणाऱ्या घटकांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे.‘कोरोना’चे वादळ जगभर पसरले आहे. सध्या २१ दिवसांचे ‘लॉकडाऊन’ असल्याने व्यवसाय आणि उद्योगांना कुलुप लागले आहे. मंगल कार्यालय व लॉन्समध्येही शुकशुकाट आहे. एरव्ही वºहाडी मंडळींच्या उत्सवी थाटाने गजबजणाºया मंगल कार्यालयांमध्ये कमालीचा सन्नाटा असून कोरोना पासून खबरदारी म्हणून विवाह सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत. यामुळे कोटी रुपयात होणारी उलाढाल ठप्प झाली आहे. याचा थेट फटका विवाह सोहळ्याची निगडीत असणाºया अन्य व्यवसायिक व छोट्या घटकांना बसला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत घरगुती विवाह सोहळे पार पाडण्याचे नियोजन केले जात आहे. मार्चच्या दुसºया पंधरवड्यात असे घरगुती विवाह सोहळे संपन्न झाले.

तारखा रद्द झाल्याने अनेक व्यावसायिकांचे नुकसान‘कोरोना’ मुळे विवाह सोहळे पुढे ढकलल्या जात असून मार्च, एप्रिल व मे महिन्यांमध्ये बुकिंग केलेल्या तारखा रद्द केल्या जात आहेत. यापूर्वी तारीख रद्द झाल्यास अ‍ॅडव्हान्स म्हणून जमा केलेल्या रकमेतून ५० टक्के रक्कम मंगल कार्यालय चालक परत देत नसत. तथापि ‘कोरोना’ आपत्तीमुळे मंगल कार्यालय मालकांना भरलेली पूर्ण रक्कम परत करावी लागत आहे. यामुळे मोठे मंगल कार्यालय चालकांचे मोठे नुकसान होत आहे.

कापड व्यावसायिकांनाही मोठी झळवधू-वरांपासून ते जवळच्या वºहाडी मंडळींसाठी रेडीमेड कपडे खरेदी केली जातात. विवाह सोहळ्यांवर या मार्केटचे मोठे बजेट असते. आहेर म्हणून देण्यात येणाºया साड्या व इतर वस्तू खरेदी रद्द झाल्याने कापड दुकानदार व रेडिमेड कपडे विक्रेते हतबल झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक