शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Coroan virus : जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 22:17 IST

बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोलपंप कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून बंद ठेवण्यात आले अस

बुलडाणा : जिल्ह्यात गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी ‘नो गॅदरींग’चा आदेश असला तरी जिल्ह्यातील पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले आहेत, असा कुठलाही आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेला नाही. ती एक निव्वळ अफवा असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. राजाराम पुरी यांनी स्पष्ट केल आहे.बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोलपंप कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून बंद ठेवण्यात आले असल्याची अफवा सध्या जिल्ह्यात फिरत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. राजाराम पुरी यांना विचारणा केली असता असा कुठलाही आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ही आवाहन त्यांनी केले आहे.जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद ठेवण्याबाबत कुठलेही आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेले नाहीत. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याबाबत अफवा पसरवली जात आहे. या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पेट्रोल पंप बंद असणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्या गोष्टी ३१ मार्च पर्यंत बंद करायच्या आहेत, त्याच्या संदर्भातील आदेश काढण्यात आले आहेत. त्यात पेट्रोलपंपाचा समावेश नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जावू नये, असे ही डॉ. पुरी यांनी स्पष्ट केले आहे.