शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणमधील सरळसेवा भरतीमुळे कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:31 IST

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने भरतीप्रक्रियेस विरोध करीत न्यायालयाची दारे ठोठावण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देमहावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदांसाठी ५ हजार आणि उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता २ हजार जागा जागांची भरती काढली आहेया भरतीत वयात सूट मिळावी, ३० टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची २०१२ पासून मागणी आहे.महावितरण कंपनीत जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर जवळपास २५० कंत्राटी कामगार काम करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महावितरण कंपनीमधील रिक्त पदांसाठी होऊ घातलेल्या सरळसेवा भरतीमुळे गेल्या १० ते १५ वर्षांपासून काम करणारे कंत्राटी कामगार दुखावले आहेत. भरतीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार असल्याची भावना त्यांच्यामधून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने भरतीप्रक्रियेस विरोध करीत न्यायालयाची दारे ठोठावण्याची भूमिका घेतली आहे.महावितरण कंपनीने विद्युत सहाय्यक पदांसाठी ५ हजार आणि उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता २ हजार जागा जागांची भरती काढली आहे. या रिक्त पदांवर राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची नेमणूक ऊर्जा खात्याने केली होती. गेली १० ते १५ वर्षे अत्यंत कमी वेतनात हे कामगार काम करीत आहेत. कमी मोबदल्यात काम करुन कंत्राटी कामगारांनी वीज कंपन्यांचे अब्जावधी रुपये वाचवले आहेत. कंत्राटी कामगारांच्या अनुभवाचा विचार न करता महावितरण कंपनीने शासनाने निर्धारित केलेल्या वयाच्या विरोधात जाऊन अर्ज करण्यासाठी ३२ वर्षापर्यंतच पात्रता ठेवली आहे. रिक्त पदांवर गेल्या १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे अनेकजण वयाच्या अटीत अपात्र ठरले आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांना या पदांवर आधी सामावून घ्यावे, त्यांना या भरतीत वयात सूट मिळावी, विशेष बाब म्हणून ३० टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची २०१२ पासून मागणी आहे. मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नाही.जिल्ह्यात २५० कंत्राटी कामगारमहावितरण कंपनीत जिल्ह्यात वेगवेगळ्या पदांवर जवळपास २५० कंत्राटी कामगार काम करीत आहे. जीव धोक्यात घालून १० ते १५ वर्षांपासून ते सेवा देत आहेत. अत्यंत कमी वेतनावर काम करुन कुटूंबाचा गाडा चालवित आहेत. महावितरण कंपनीच्या सरळसेवा भरतीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्यास त्यांचे कुटूंब रस्त्यावर येईल. कंत्राटी कामगारांना भरतीत सवलतीसह प्राधान्य देण्याची गरज आहे.महावितरणची सरळसेवा भरती कंपनीच्या मुख्य कार्यालयातून राबविली जाणार आहे. रिक्त पदांची भरती, आरक्षण, निवड प्रक्रिया सर्व काम तेथूनच होणार आहे.- दीपक देवहातेअधीक्षक अभियंता, महावितरण, बुलडाणामहाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने १० जुलै ऊर्जामंत्र्यांना पत्र देऊन भरतीप्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे. त्यावर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना तातडीने संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे. या बैठकीतून न्याय मिळाला नाही तर संघटना रस्त्यावर उतरणार आहे.- नीलेश खरातप्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण