शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोविड केअर सेंटरमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच इन्शुरन्स नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 11:10 IST

Do not have insurance cover : या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १२७ जण कोरोना बाधितही होऊन गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ३३ शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचाच  इन्शुरन्स नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात या कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १२७ जण कोरोना बाधितही होऊन गेले आहे. दरम्यान एका कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहेत. आधी फ्रंटलाइन वर्कर्सचा इन्शुरन्सचा हप्ता केंद्र सरकार भरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून तोही बंद करण्यात आला आहे. त्यातच आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा हा विम्याचा मुद्दा समोर आला आहे. गेल्या वेळी कोविडचा संसर्ग कमी झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना तातडीने कमी करण्यात आले होते. त्यावेळीही या कर्मचाऱ्यांनी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली होती.  मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. एनआएचएममध्ये या कर्मचाऱ्यांना समाविष्ट केले जावे, अशी पूर्वीपासूनची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनाही मधल्या काळात या कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन मागणी रेटली होती. दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर पुन्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेण्यात आले आहे. मात्र त्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत, असे नीलेश इंगळे, दयानंद गवई व सहकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकट काळात देत असलेल्या सेवेचाही  प्रशासनाने विचार करावा, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोविड केअर सेंटरवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याची मागणी मागणी आहे. किमानपक्षी तूर्तास एनआरएएममध्ये तरी समाविष्ट केले जावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी आमचा लढा सुरू आहे.-अमोल गवई, जिल्हाध्यक्ष

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायमस्वरूपी समावून घ्यावे, अशी आमची प्रमुख मागणी असून, या मागणीसाठी आम्ही आंदोलनात्मक भूमिकाही घेतली होती. दरम्यान, विमा संरक्षण व संबंधित सुविधा न मिळाल्यास प्रसंगी आम्ही कामबंद आंदोलनही करू.-शेख जहीर शेख शब्बीर, कोविड योद्धा कर्मचारी परिषद, अभियान प्रमुख

टॅग्स :buldhanaबुलडाणाEmployeeकर्मचारी