शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 11:56 IST

Congress protests against the central government : सर्व आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आराेप करीत काँग्रेसने भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्रातील मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. अर्थव्यवस्था, कोरोनो महामारीशी लढा, वाढती महागाई, सतत वाढणारे डिझेल-पेट्रोलचे दर, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांचे आंदोलन, अशा सर्व आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आराेप करीत काँग्रेसने भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.  यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दुमदुमला होता. सात प्रतिकात्मक मडकी यावेळी फाेडण्यात आली़, तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.   २०१४ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध सोशल मीडिया, मीडियाच्या माध्यमातून जनतेला भूलथापा दिल्या. अच्छे दिन आयेंगे; परंतु अच्छे दिन तर आलेच नाहीत, उलट बुरे दिन आले म्हणून आता जनता टाहो फोडत आहे, असा आराेप यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला़  पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.  त्याचबरोबर गॅसचे भावदेखील ९०० पर्यंत गेले आहेत. जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यावर पेट्रोल-डिझेल भाववाढीचा परिणाम झाला आहे.  हे सरकार सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेले आहे, असा आराेप करीत यावेळी सरकारविराेधी घाेषणा देण्यात आल्या़ यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड , प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते ॲड. बाबासाहेब भोंडे, ज्येष्ठ काँग्रेस नेते लक्ष्मणराव घुमरे, महिला काँग्रेस प्रदेश सरचिटणीस ॲड. जयश्री शेळके, सभापती पंचायत समिती बुलडाणा उषा  चाटे, संगीता गाडेकर, विद्या  देशमाने, अनिता घुगे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज कायंदे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश खेडकर,  राजेश मापारी, डाॅ़  इसरार जमादार, ॲड. अमर पाचपोर,              सतीश महेंद्रे, सुनील सपकाळ, गणेश पाटील, संजय पांढरे, रमेश कायंदे, श्याम राठी, नीलेश पाउलझगरे, साहेबराव पाटोळे, प्रा. गजानन खरात उपस्थित हाेते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेस