शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नगरसेवकांच्या ‘गैर’वर्तणुकीवर शिक्कामोर्तब!, पालिका सभागृहात बहुमत: १२ नगरसेवकांच्या अपात्रता प्रस्ताव प्रकरणी ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 20:01 IST

काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना पालिका सभेतील गैर वर्तनामुळे पदावरून दूर करण्यासाठी  बुधवारी पालिका सभागृहात खास सभा पार पडली.

खामगाव :  काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना पालिका सभेतील गैर वर्तनामुळे पदावरून दूर करण्यासाठी  बुधवारी पालिका सभागृहात खास सभा पार पडली.  या सभेत काँग्रेसच्या सर्वच १२ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी बहुमताने ठराव संमत करण्यात आला.  या ठरावाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शविला. सत्ताधारी आणि विरोधी सदस्य या ठरावावरून समोरा-समोर भिडले. त्यामुळे सभागृहात काही वेळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते.नगर परिषदेच्या सभांमध्ये वारंवार गोंधळ तसेच सभेची नोटीस वेळेत पाठविल्यानंतर ती न घेता वेळेवर मिळाली नसल्याचे सांगुन काही नगरसेवकांकडून गैरवर्तन होत असल्याचे निर्दशनास आल्यानंतर नगराध्यक्षा अनिताताई डवरे यांनी ३ फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.  बुधवारी या नगरसेवकांच्या अपात्र ठरविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४२ (३) अन्वये शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी चर्चा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांच्या सभेतील गैर वर्तनावर सत्ताधाºयांनी बहुमताने शिक्कामोर्तब केला. यावेळी २० विरुध्द ११ अशा बहुमताने काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा अपात्रता प्रस्ताव मंजूर झाला. तर भारिप बहुजन महासंघाचे नगरसेवक विजय वानखडे या सभेला अनुपस्थित होते. सोबतच भाजप समर्थित एक अपक्ष नगरसेविकेचीही यावेळी अनुपस्थिती होती. या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष अनिताताई डवरे, मुख्याधिकारी धंनजय बोरीकर, उपाध्यक्ष संजय मुन्ना पुरवार यांची उपस्थिती होती.

काँग्रेसच्या नगरसेवकांविरोधात घेण्यात आला ठराव!पालिका सभेत गैर वर्तणुकीचा आरोप असलेल्या  काँग्रेसच्या गटनेत्या अर्चना टाले, नगरसेवक अमेय राजेंद्र सानंदा, प्रविण कदम, भुषण शिंदे, इब्राहीम खान सुभान खान, शीतल माळवंदे, संगीता पाटील, शे.फारूक बिस्मील्ला, शे.रिहानाबानो महेबुब, अ.रशिद अ.लतीफ, अलकाबाई सानंदा या ११ नगरसेवकांसह स्वीकृत नगरसेविका सरस्वतीताई खासणे यांना अपात्र ठरविण्यासाठी बुधवारी पालिकेच्या खास सभेत बहुमताने ठराव संमत करण्यात आला.

काँग्रेस नगरसेवकांकडून निषेध! नगरसेवक अपात्रता प्रकरणी मंजूर करण्यात आलेल्या ठरावासोबतच सत्ताधाºयांच्या मनमानी कृतीचा काँग्रेस नगरसेवकांनी तीव्र निषेध नोंदविला. पालिकेची खास सभा संपताच प्रवेशद्वारावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र निर्दशने केली. काँग्रेसच्या नगरसेवकांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांनी समर्थन दिले. त्याचवेळी  काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या भारिप नगरसेवक विजय वानखडे यांची यावेळी आणि सभेला अनुपस्थिती होती.