शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:12 IST

बुलडाणा  : गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत कमी झाल्या असतानासुद्धा शासनाने नफेखोरीसाठी पेट्रोल, डीझल, गॅस सिलिंडर इंधनाचे भाव कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरल्या जात आहे. त्यामुळे जनमानसात शासनाविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झालेला असल्याने भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या  माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज शहर कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसच्यावतीने आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाचा निषेध तहसीलदारांना निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत कमी झाल्या असतानासुद्धा शासनाने नफेखोरीसाठी पेट्रोल, डीझल, गॅस सिलिंडर इंधनाचे भाव कमी केलेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता वेठीस धरल्या जात आहे. त्यामुळे जनमानसात शासनाविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झालेला असल्याने भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या  माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आज शहर कॉंग्रेस व तालुका कॉंग्रेसच्यावतीने आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढीच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.या बैलगाडी मोर्चामध्ये बुलडाणा शहर व तालुक्यातून मोठय़ा संख्येने लोक उपस्थित होते. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. सदर मोर्चा पुढे संगम चौक- जयस्तंभ चौक- बाजार लाइन- जनता चौक कारंजा चौक- स्टेट बँक चौकातून तहसील कार्यालयावर पोहोचला. मोर्चात ५0 हून अधिक बैलगाड्या सामिल झाल्या होत्या. प्रत्येक बैलगाडीवर बॅनर, कॉंग्रेस पक्षाचे झेंडे, छोटे फलक तथा केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत स्वयंस्फूर्तीने असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.  विशेष म्हणजे मोर्चाला सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त दाद देत आपला पाठिंबा दर्शविला.  दरम्यान मोर्चा तहसील कार्यालय बुलडाणा येथे येऊन आ. हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंग राजपूत, तालुकाध्यक्ष सुनील तायडे, रसुल खान, दत्ता काकस,  नंदकिशोर शिंदे, रिजवान सौदागर, कौतिकराव पाटील, पुरूषोत्तम देवकर यांनी सुरेश बगळे तहसीलदार बुलडाणा यांना निवेदन दिले. याप्रसंगी महेंद्र बोर्डे, शेषराव पाटील, अमोल तायडे, उषाताई चाटे, चांद मुजावर, प्रभाकर वाघ, अभय मोरे, भागवत वानेरे, विजू काळवाघे, रमेश काळवाघे, अनिल खाकरे-पाटील, अँड. गणेशसिंग राजपूत, उखा चव्हाण, महेंद्र गवई, जाकीर कुरेशी, युनूस खा सहाब, बबलु मावतवाल, आसिफ, अफसर सरवर, अमिन टेलर, अँड. राज शेख, तारीक नदीम, अन्वर शेख, इरफान कुरेशी, आरिफ खान, निजाम शेख हनिफ शेख, सखाराम पाटील, जुनेद खान, विजय कड, जावेद खान, रवींद्र भाकरे, बाळु जगताप, गणेश पाटील, नागेश उबरहंडे, शालीक्राम पाटील, राजू सुसर, अंकुशराव पाटील, सुधाकर पाटील, अशोकराव सावळे, तेजराव सावळे, किशोर चांडक, साहेबराव चव्हाण, रणिजित झाल्टे, अभिमन्यू जाधव, गजानन भुसारी, बबनराव पाटील, भारत भिसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेसagitationआंदोलन