शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आक्रमक; संग्रामपूर येथे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:13 IST

संग्रामपूर:- शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता पासून संग्रामपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर:- शासनाच्या उदासीन धोरणा विरोधात संग्रामपूर तालुक्यातील काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी नऊ वाजता पासून संग्रामपूर येथे तालुका काँग्रेस कमिटी कडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. तामगाव पोलिसांनी रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून देण्यात आले. संग्रामपूर तालुक्यात गंभीर स्वरूपाचे दुष्काळ असल्याने बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई तसेच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. यावर राज्य शासनाकडून उपाययोजना करण्यात न आल्याने येथील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. जमिनीतील पाण्याचे स्त्रोत आटल्याने येथील बागायत क्षेत्र तथा फळबाग नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने असंख्य शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. शासनाकडून करण्यात आलेल्या घोषणा हवेत विरल्याने येथील शेतकरी देशोधडीला टेकला. शेतकऱ्यांनी पीक विमा काढून सुद्धा त्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध होत नाही. रासायनिक खते बियाणे यांचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढला. अशा विविध मागण्यांचे निवेदन १५ मे रोजी संग्रामपुर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार संग्रामपूर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते. दुष्काळावर उपाययोजना करा तसेच तालुक्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी शासकीय योजना राबवून तालुक्याला दुष्काळ मुक्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. आजतागायत राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत केली नाही. १४० गाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत कोट्यवधीचा खर्च करण्यात आला परंतु बहुतांश गावांमध्ये येथील पाणी पोहोचलेच नाही. जल युक्त शिवार योजना नावापुरती उरली असून प्रत्यक्षात याचा फायदा झाला नाही. दुष्काळग्रस्त भागात उपाय योजना राबवून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती परंतु शासनाने याची दखल न घेतल्याने सोमवारी तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक होत रस्त्यावर उतरली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्धा तास रस्ता रोखून धरला त्यावेळी तामगाव पोलिसांनी आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. या आंदोलनात संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र वानखडे, मनोहरराव बोराखडे, संजय ढगे, संतोष राजनकर, सै आसिफ, हरिभाऊ राजनकार, सुरेश हागे, प्रकाश देशमुख, तेजराव मारोडे, प्रशांत गिरी, एकनाथ इलामे, अरुण निंबाेळकार , रमेश इलामे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरcongressकाँग्रेस