शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्रेड अल्टा मॅरेथॉन शारीरिक व मानसिक कसोटी- नितीन चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जागतिकस्तरावर मानाची  आणि अत्यंत कठीण अशा दक्षिण आफ्रिकेतील अल्टा कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत व्यवसायाने कंत्राटदार असलेले नितीन चौधरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कजागतिकस्तरावर मानाची  आणि अत्यंत कठीण अशा दक्षिण आफ्रिकेतील अल्टा कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत व्यवसायाने कंत्राटदार असलेले नितीन चौधरीयांनी   ९ जून रोजी ११ तास ५८ मिनीटात ८७ किमीचे अंतर पूर्ण करून बुलडाण्याचा झेंडा  फटकवला. जगातून २१ हजार स्पर्धेक यात सहभागी झालेहोते. त्यात टिकून बुलडाण्याचा लौकिक वाढविणाºया नितीन चौधरींशी साधलेला हा संवाद...

आता पुढील उदिष्ट काय?यंदा ८७ किमीची अप रनची ही स्पर्धा पूर्ण केली. पुढील टप्प्यात याच स्पर्धेत ९० किमीच्या डाऊन रन मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन ती पूर्ण करण्याचेउदिष्ट आहे.

आपण स्पर्धा पूर्ण करू या बाबात आश्वस्त होता का?नामांकित आणि अत्यंत टफ अशी ही स्पर्धा आहे. शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची येथे कसोटी लागते. सहा वर्षापासून धावण्याचा सराव होता.२०१६ पासून खºया अर्थाने प्रशिक्षण सुरू केले. स्पर्धा पूर्ण करण्याबाबत आश्वस्त होतो. परंतू स्पर्धेदरम्यान, काठिण्य पातळी  पाहता मनातनकारात्मक विचार येतात. सहा महिन्यापासून पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेची तयारी केली होती.

तापमान किती फायदेशीर ठरले?डरबन ते पीटरमिरसबर्ग दरम्यान पाच कटआॅफ मध्ये ही स्पर्धा घेण्यात येते. तेथे पायथ्याला १४ ते १६ आणि शिखरावर ४ ते ५ अंश सेल्शियस  तापमान असते. इकडे आपण ३५ ते ४० अंश सेल्शियसमध्ये सराव करतो. त्यामुळे ते वातावरण एक उत्साह वाढविणारे ठरते. त्याचा नक्किच फायदा झाला. परंतू  पाच कटआॅफमध्ये निर्धारित वेळेत स्पर्धा पूर्ण न केल्यास मेडल आणि सर्टीफिकेटही मिळत नाही.

स्पर्धेची माहिती कशी मिळाली?औरंगाबाद येथे आमचा रणर ग्रुप आहे. त्यांच्याकडून या स्पर्धेची माहिती मिळाली. सोबतच योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे येथे पर्यंत पोहोचता आले.

स्पर्धेसाठी पात्रतेचा निकष काय?या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी प्रथत: ४२ किमीची मॅरेथॉन चार तास ५० मिनीटामध्ये पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे. यंदाची ९५ मॅरेथॉन ही दोनआफ्रिकन खेळाडूंनी जिंकली आहे. त्यांनी ५ तास २९ मिनीट आणि पाच तास ३० मिनीटात हे अंतर पार गेले तर तिसºया स्थानी जपानी खेळाडू होता.महिलांमध्ये आॅॅस्ट्रेलियाच्या महिलेने ही स्पर्धा जिंकली असून जवळपास त्यासाठी तीने सहा तासांचा अवधी घेतला. आफ्रिकेतील कॉम्रेड अल्टा यासोल्जरला ही स्पर्धा समर्पित आहे.

ेसमुद्र सपाटीपासून दोन हजार मिटर उंचीवर ही स्पर्धा घेण्यात येते. मानसिकस्तरावर कणखर बनण्यास या स्पर्धेतून मदत मिळते. आपले मुळ असलेल्या बुलडाणा शहरातील अ‍ॅथलिट्सनाही प्रोत्साहित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. स्पर्धा फारच टफ आहे. १६ ते ४ अंश सेल्सियस दरम्यान तापमान तेथे असते. स्पर्धेदरम्यान अनेक नकारात्मक विचार येतात. त्यावर मात केलेलाच स्पर्धेत टिकतो.

- नितीन चौधरी

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत