शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात ग्राहक मंचामध्ये दुपटीने वाढला तक्रारींचा अेाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:48 IST

Consumer Forum गेल्या संपूर्ण वर्षाचा विचार करता जिल्हा ग्राहक मंचात वर्षभरात ५०९ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाच्या काळात जिल्हा ग्राहक मंचमध्ये तक्रारींची संख्या २०१९ च्या तुलनेत  दुपटीने वाढली आहे. त्यातच यासंदर्भातील कायद्यात दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहक तक्रार निवारण मंचऐवजी आता त्यास ग्राहक तक्रार निवारण आयोग असे स्वरूप आले आहे. सोबतच याची व्याप्तीही नव्या कायद्यामुळे वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मार्च २०२० पासून सुरू झाले होते. गेल्या संपूर्ण वर्षाचा विचार करता जिल्हा ग्राहक मंचात वर्षभरात ५०९ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ज्याचे प्रमाण २० टक्के आहे. २०१९ या वर्षात प्राप्त तक्रारींचा विचार करता २०२० मध्ये दुपटीने तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०१९ मध्ये एकूण २७२ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी २६७ प्रकरणांत ग्राहकमंचाने निकाल दिले आहेत. प्रकरणे निकाली काढण्याचे हे प्रमाण तब्बल ९८ टक्के असल्याचे सूत्रांनी सांगितले.एकंदरीत कायद्यातील दुरुस्तीमुळे ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्र व व्याप्ती वाढली आहे. बाजारमूल्यानुसार ज्या तक्रारींचे मूल्य हे २० लाखांच्या जवळपास आहे, अशा तक्रारीही येथे आता नव्या दुरुस्तीमुळे करता येत आहेत. त्यामुळे ग्राहक संरक्षण व त्यांचे हित जपण्यास एक मोठी मदत मिळत आहे. 

व्याप्ती वाढलीग्राहक मंचास आता नव्या कायद्यानुसार ग्राहक तक्रार निवारण आयोग संबोधण्यात येत आहे. सोबतच या नव्या कायदयानुसार ग्राहक मंचाची व्याप्ती वाढली आहे. द कन्झ्युमर प्राटेक्शन ॲक्ट- २०१९ नुसार हा बदल झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रामुख्याने या तक्रारी होतात दाखलपीक विमा, नॅशनल इन्श्युरन्स, अेारिएनटल इन्शुरन्स, शेतकरी अपघात विमा, बियाणे कंपन्याविरोधातील दावे, इलेक्ट्रीकल आणि होम अप्लायन्ससंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाconsumerग्राहकConsumer Goodsग्राहकोपयोगी वस्तू