आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा केसाने गळा कापला : राजपूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST2021-09-16T04:43:00+5:302021-09-16T04:43:00+5:30

चिखली : आघाडी सरकार जातिजातीत भांडणे लावत असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्प्रयासाने मराठा समाजाला मिळालेले आरक्षण या ...

Coalition government beheads OBCs: Rajputs | आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा केसाने गळा कापला : राजपूत

आघाडी सरकारने ओबीसी समाजाचा केसाने गळा कापला : राजपूत

चिखली : आघाडी सरकार जातिजातीत भांडणे लावत असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्प्रयासाने मराठा समाजाला मिळालेले आरक्षण या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे गमवावे लागले़ आता आघाडी सरकारच्याच निष्काळजीपणाने ओबीसींचे आरक्षण गमवावे लागल्याने या सरकारने मराठा समाजाच्यासोबतच ओबीसींचा सुद्धा केसाने गळा कापल्याचा घणाघाती आरोप भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह राजपूत यांनी केला़ चिखली येथे भाजपाच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ते बाेलत हाेते़

ओबीसी आरक्षण प्रकरणी भाजपच्यावतीने आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबर राजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डॉ. प्रतापसिंग राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, सुहास शेटे, नगरसेवक गोविंद देव्हडे, नाम गुरुदासानी, अनुप महाजन, दिलीप डागा, अॅड. संजीव सदार, सागर पुरोहित, विजय खरे, किशोर जामदार, अक्षय भालेराव, रणजित देव्हडे, रमेश सोळंकी, रमेश अकाळ, सचिन कोकाटे, चेतन देशमुख, विजय वाडेकर, सचिन कुलवंत, श्रीकृष्ण चौथे, विठ्ठल परिहार, दिगांबर जाधव, ज्ञानेश्वर वाघ, निवृत्ती जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Coalition government beheads OBCs: Rajputs