शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेडींग केलेला उडीद विकून शेतकऱ्यांचे चुकारे द्या - रयत क्रांती संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 16:29 IST

शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे देण्यात यावे तसेच हरभरा, तुरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी आॅनलाईन नोंद करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देयाबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उडीद उत्पादक शेतकऱ्यांसह ४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले. मागणी जिल्हाधिकारी व जिल्हाउपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली जिनिंगने खरेदी केलेला निकृष्ट उडीद ग्रेडींग मशीन लावून उत्कृष्ट करणे सुरू आहे. तो उडीद विकून अथवा वेअर हाऊसला साठवून प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे देण्यात यावे तसेच हरभरा, तुरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी आॅनलाईन नोंद करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाºयांनी उडीद उत्पादक शेतकऱ्यांसह ४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये शासनाने हमीभाव देऊन उडीद खरेदी केला होता. मात्र, चिखली जिनिंग संस्थेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून जुना व निकृष्ठ उडीद खरेदी केल्यामुळे उत्कृष्ठ दर्जाचा माल देणाºया प्रामाणिक शेतकऱ्यांच्या उडीदाचे चुकारे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अडकल्याचा आरोप केला आहे. तसेच तूर व हरभरा या शेतमालाचेही पैसे अद्याप खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असल्याने चिखली सेंटरवर ग्रेडींग सुरु असलेल्या उडदाचा पंचनामा करण्यात यावा, जे शेतकरी तूर, हरभरा हमीभावाने देऊ शकले नाही ते अनुदानापासुन वंचीत राहु नये, यासाठी रजीस्टर नोंद असलेल्याचे शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात याव्यात, रखडलेले पैसे त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, व ग्रेडींग सुरु असलेला उडीद विकूण अथवा वेअर हाऊसला साठवून शेतकऱ्यांचे रखडलेले उडदाचे चुकारे देण्यात यावे, व संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हाउपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विनायक सरनाईक, संतोष राजपुत, अनिल चौहाण, विलास तायडे, जिजा संजय थोरात, शिवाजी पंडीत, अरूण तायडे, दुर्गाबाई तायडे, गोकुळ धनावत, रमेश पाटिल गवते, भास्कर काळे, गजानन पवार, गजानन गाडेकर, मदन काळे आदींसह शेतकरी उपस्थीत होते. (तालुका प्रतिनिधी)कॅप्शन : निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी.

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय