शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटात हाणामारीनंतर बोरी अडगाव बंद; जमावबंदीचे आदेश, गावात पोलिसांचा बंदोबस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:25 IST

खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही.

ठळक मुद्देखामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्याम घुगे हे स्वत: उपस्थित झाले आहेत. 

खामगाव : तालुक्यातील बोरी अडगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाणीनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे बुधवारी सकाळी गावातील एकही दुकान उघडले नाही. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक श्याम घुगे हे स्वत: उपस्थित झाले आहेत. गाडी रस्त्यात उभी केल्याच्या कारणावरुन बोरी अडगाव येथे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली होती. यामध्ये रामेश्वर नारायण टिकार हे गंभिर जखमी झाले. तर सारंगधर श्रीराम टिकार, अच्युत टिकार व रोशन टिकार हे तिघे सुध्दा जखमी झाले. यातील रामेश्वर टिकार व रोशन टिकार यांच्यावर अकोला येथे सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गावातीलच आनंदा पुरुषोत्तम सुरवाडे या व्यक्तीने अंगावर इंडिका गाडी आणल्याने याठिकाणी दोन गटात तुफान मारहाण झाली होती. यात पाच जण जखमी झालेल्यांवर खामगाव व अकोला येथे उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी दोन्ही गटाकडून तक्रारी प्राप्त झाल्या असून खामगाव ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

गावात पोलिस बंदोबस्त घटनेमुळे गावात निर्माण झालेले तणावाचे वातावरण लक्षात घेवून अतिरिक्त पोलिस अधिक्षक शाम घुगे यांनी भेट दिली. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. ठाणेदार शेख यांच्या नेतृत्वात गावात पोलिस चमू तैनात आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावPoliceपोलिस