शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर चाकू रोखून दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:25 IST

दीड वर्षाच्या चिमुकलीवर चाकू रोखून एमआयडीसीमधील एका  घरावर चड्डी-बनियान टोळीने दरोडा टाकून घरातील पावणे दोन लाखाचा ऐवज  सोमवारी लुटला. 

ठळक मुद्देएमआयडीसीमधील घटना पावणे दोन लाखाची केली लूट!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : दीड वर्षाच्या चिमुकलीवर चाकू रोखून एमआयडीसीमधील एका  घरावर चड्डी-बनियान टोळीने दरोडा टाकून घरातील पावणे दोन लाखाचा ऐवज  सोमवारी लुटला. सुटाळा बु. एमआयडीसी परिसरातील गौरा नगर येथील विजय भीमराव गवई (वय  ३0) यांच्या घरी सोमवारी मध्यरात्री दरम्यान तीन दरोडेखोरांचा समावेश  असलेल्या चड्डी -बनियानधारी टोळीने घराच्या मुख्य दरवाजांचा कडी-कोंडा  तोडून आत प्रवेश केला. यावेळी घरामध्ये आई-वडिलांसोबत झोपेत असलेल्या  दीड वर्षाची चिमुकली माही हिला दरोडेखोरांनी उचलून तिच्यावर चाकू रोखला व  विजय गवई आणि त्यांच्या पत्नीकडे अलमारीच्या चावीची मागणी केली. मुलीचा जीव संकटात असल्याचे पाहून विजय गवई यांनी दरोडेखोरांना  अलमारीच्या लॉकरची चावी दिली. दरोडेखोरांनी अलमारीतील रोख आणि  सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ७५ हजार २00 रुपयांचा ऐवज लुटला. सोब तच विजय आणि त्यांची पत्नी मनिषा गवई यांना रूममध्ये कोंडून पळ काढला.  यावेळी विजय गवई यांनी मागच्या दरवाजाने कशी-बशी स्वत:ची सुटका करून  घेऊन थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना  दिली. यावेळी पोलिसांनी तीन अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध कलम ३९२, ४४८, ३४  भादंविनुसार गुन्हा दाखल केला. दरोड्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासन  खळबळून जागे झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन डॉग स्कॉडला  पाचारण केले. यावेळी एएसपी घुगे, डीवायएसपी पाटील यांनी घटनास्थळी  पोहोचून दरोड्याची माहिती घेतली. सोमवारी मध्यरात्रीदरम्यान चड्डी-बनियान  टोळीने खराटे ले-आउट भागात दरोड्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे, तसेच या  अगोदरही शहरातील मीरा नगर, घाटपुरी नाका या भागातही चड्डी-बनियान टोळीने  चोरीचा प्रयत्न केला होता. ही टोळी शहरात सक्रिय असल्याचे समजते.शहरात खळबळ या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून, दरोड्याची माहिती मिळ ताच एएसपी, डीवायएसपीसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.  दरोडेखोरांचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी डॉग स्कॉडला पाचारण केले आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हा