शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चिखली पोलिसांची भाऊबीज भिल्ल वस्तीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 16:07 IST

Chikhali Police News चिखली पोलिसांनी रोजमजुरी करून गुजराण करणाऱ्या गरीब महिलांच्या घरी भाऊबीज साजरी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : प्रत्येकजण आपापल्या कुटूंबियांसमवेत उत्साहात दिवाळी साजरी करत असताना ‘जनतेची सुरक्षा हीच आमची दिवाळी’ मानून ऐन दिवाळीतही चोखपणे कर्तव्य बजावणाºया चिखली पोलिसांनी रोजमजुरी करून गुजराण करणाऱ्या गरीब महिलांच्या घरी भाऊबीज साजरी केली आहे.पोलिसांना दिवाळीसारख्या मोठा सण देखील आपल्या परिवारासमवेत साजरा करता येत नाही. उलटपक्षी दिवाळीत कोणावरही विघ्न येवू नये यासाठी डोळ्यात तेल ओतून त्यांना आपले कर्तव्य पार पाडावे लागते. हे होत असताना अनेकांची दिवाळी अंधारात जात असल्याची बाब पोलिसांपासून लपून राहत नाही. त्यात यंदा कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे असल्याची बाब हेरून चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी कर्तव्य बजावत असतानाच दुर्लक्षित, गोरगरीबांत मिळसून त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली आहे. याअंतर्गत १६ नोव्हेंबर रोजी त्यांनी सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांसवमेत तालुक्यातील मलगी येथील भिल्ल समाजातील हातमजुरीवर गुजरान करणाऱ्या गरीब महिलासमवेत भाऊबीज साजरी करून एक सुखद धक्का दिला. यावेळी ठाणेदार वाघ यांच्यासमवते एएसआय बाळु राजपूत, हेकाँ अशपाक, नापोका शरद गिरी, पोकॉ रणजित हिवाळे, समाधान सोणागरे, पोलिस पाटील भगवान शेळके यांची उपस्थिती होती. कोणताही गाजावाजा नाही की, पूर्वकल्पना नाही. अशा स्थितीत अचानकपणे वस्तीवर खाकीच्या रूपात आलेल्या भावांकडून मिळालेले प्रेम, आपुलकी आणि भाऊबीजेच्या भेटीने वस्तीवरील महिलांनाही गहिवरून आले. तर नागरीकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी यासाठी कुटूंबियांपासून दूर राहून चोविस तास ऑन ड्युटी असणाऱ्या पोलिसांनाही यामाध्यमातून बहिणीची माया मिळाल्याने ते देखील भारावले.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली