लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : जवळच असलेल्या पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयावर १२ वीचे पेपर सुरू असल्याने या शाळेवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका होमगार्डला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली. चिखली तालुक्यातील पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयावर १२ वीचे पेपर सुरू असल्याने या शाळेवर बंदोबस्तासाठी असलेले होमगार्ड जगन्नाथ ठेंगर (वय २२) रा. चिखली शाळेसमोरील रस्त्यावर अंकुश अर्जुन तायडे रा.पेठ याला हटकण्यासाठी गेले असता, शिवीगाळ व लोटपोट केली व डोक्यावर दगड मारून जखमी केले, अशी तक्रार अमडापूर पो.स्टे.ला होमगार्ड सचिन जगन्नाथ ठेंगर यांनी दिल्यावरून अंकुश अर्जुन तायडे रा.पेठ याच्याविरुद्ध कलम ३५३, ३३३, ५0४, ५0६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार विक्रांत पाटील हे करीत आहेत. या महाविद्यालयावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा केंद्रावर वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
चिखली : १२ वीच्या परीक्षेदरम्यान शाळेवर कार्यरत होमगार्डला मारहाण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:59 IST
अमडापूर : जवळच असलेल्या पेठ येथील ज्ञानेश्वर विद्यालयावर १२ वीचे पेपर सुरू असल्याने या शाळेवर बंदोबस्तासाठी असलेल्या एका होमगार्डला मारहाण करून जखमी केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली.
चिखली : १२ वीच्या परीक्षेदरम्यान शाळेवर कार्यरत होमगार्डला मारहाण!
ठळक मुद्देएकाविरुद्ध गुन्हा दाखलपरीक्षा केंद्रावर वरिष्ठांनी लक्ष ठेवण्याची मागणी