शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा : येळगावनजीक नदी पात्रात पडलेल्या रसायनाने घेतला पेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:44 IST

बुलडाणा :  येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावरून  केमिकलचा टँकर कोसळल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी नदीपात्रात पडलेल्या केमिकलने अचानक पेट घेतल्याने रस्ता व परिसरातील झाडे जळाली. त्यामुळे चिखली-बुलडाणा मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद होती.

ठळक मुद्देयेळगावजवळील घटना; लगतची झाडे जळाली 

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा :  येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावरून  केमिकलचा टँकर कोसळल्याची घटना ७ एप्रिल रोजी घडली होती. दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी नदीपात्रात पडलेल्या केमिकलने अचानक पेट घेतल्याने रस्ता व परिसरातील झाडे जळाली. त्यामुळे चिखली-बुलडाणा मार्गावरील वाहतूक काही वेळ बंद होती.कर्नाटकमधून साबणाचे केमिकल भरलेला टँकर घेऊन चालक पन्नाराम भारमाल वय २५ रा. राजस्थान हा मध्यप्रदेशमधील पालमपूरला जात होता. येळगावनजीकच्या पैनगंगा नदीवरील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर पुलावरून खाली कोसळला होता. चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघात घडल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने टँकर काढून घेण्यात आला होता; मात्र नदी पात्रात मोठय़ा प्रमाणावर केमिकल पडले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी या केमिकलने पेट घेतला. त्यामुळे अचानक आग लागली. आगीच्या ज्वाळांनी रुद्र रूप धारण केले. सुदैवाने या आगीमुळे कुठलीच अनुचित घटना घडली नाही. आगीमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाने धाव घेत आग विझवली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.  दरम्यान, ही आग वाढत्या तापमानामुळे लागली की इतर कारणामुळे, याबाबत चर्चा रंगली होती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग