शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा पाठलाग, आरोपीस दोन वर्षांचा कारावास

By अनिल गवई | Updated: August 11, 2023 16:40 IST

आरोपीने तिचा पाठलाग करून वाईट उद्देशाने तिची ओढणी ओढून विनयभंग केला.

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा सिध्द झाल्याने एका आरोपीस दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी.कुळकर्णी यांनी हा महत्वपूर्ण निकाल शुक्रवारी दिला.पिडीत अल्पवयीन मुलगी ही ११ सप्टेंबर २०२१ रोजी शिकवणीसाठी जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून वाईट उद्देशाने तिची ओढणी ओढून विनयभंग केला.

तसेच लग्नाची गळ घालून अल्पवयीन मुलीच्या भावास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीतेने १४ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपिविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन एपीआय राहुल जगदाळे यांनी केला व तपासाअंती दोषारोपत्र सादर केले. आरोप सिध्द करण्याच्या अनुषंगाने न्यायालयात सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, पिडिता व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने न्यायमूर्ती कुळकणी यांनी आरोपी अक्षय गणेश इंगळे यांस भादंविच्या कलम ३५४, ३५४ डी व कलम ५०६ अंतर्गत शिक्षा सुनावली.

यामध्ये भादंविच्या कलम ३५४ मध्ये दोन वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तो न भरल्यास दोन महिने शिक्षा, कलम ३५४ डी मध्ये १ वर्षाचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, तो न भरल्यास १ महिन्याचा सश्रम कारावास तसेच कलम ५०६ नुसार दोन वर्षाचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कार (भालेराव ) यांनी काम पाहिले. तसेच अॅड. संजय बडगुजर यांनी सरकार पक्षास सहकार्य केले. कोर्ट पैरवी म्हणून ठाकुर यांनी मदत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी