शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

हमाल कंत्राटदारांच्या निवड प्रक्रियेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 12:26 IST

जिल्ह्यातील १६ धान्य गोदामावर वेगवेगळे हमाल कंत्राटादार निवडले जाणार असून, जो सर्वात कमी दर निश्चित करेल, त्या कंत्राटदाराला प्राध्यान्य दिले जाणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात आतापर्यंत शासकीय धान्य गोदामातील हाताळणूक एकाच हमाल कंत्राटदारावर सोपविण्यात येत होती. परंतू आता हमाल कंत्राटदार निवडण्याचे स्वरूप बदलले आहे. जिल्ह्यातील १६ धान्य गोदामावर वेगवेगळे हमाल कंत्राटादार निवडले जाणार असून, जो सर्वात कमी दर निश्चित करेल, त्या कंत्राटदाराला प्राध्यान्य दिले जाणार आहे. त्यामुळे धान्य गोदामातील हमाल कंत्राटदारांच्या स्पर्धेला लगाम लागणार आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत होणाऱ्या अन्नधान्य वितरणासाठी जिल्ह्यात १६ शासकीय धान्य गोदामे आहेत. पहिले एकच संस्था सर्व गोदामाचा हमालीचा कारभार पाहत असे. परंतू आता तसे होणार नाही. मध्यंतरी जिल्ह्यातील हमालांकडून मजूरीच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता. तसेच धान्य हाताळणूक हमाल कंत्राट व वाहतूक असे दोन्ही कंत्राट एकत्र देण्यात येत होते; तो शासन निर्णय सुद्धा रद्द झाला आहे.जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावरील शासकीय धान्य गोदामातील अन्नधान्याच्या हाताळणूकीसाठी हमाल कंत्राट चालू वाहतूक कंत्राट संपेपर्यंत किंवा तीन वर्ष यापैकी जे अगोदर घडेल, त्या कालावधीसाठी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.धान्य हमाल कंत्राट निवडण्याची प्रक्रिया ही आॅनलाइन राबविण्यात येत आहे. त्यासाठी २५ नोव्हेंबरपासून कंत्राटदारांना निविदा मागविण्यात आली आहे. यावेळी एकाच संस्थेकडे सर्व गोदामांचा कारभार राहणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, अमडापूर, देऊळगाव राजा, मलकापूर, मोताळा, संग्रामपूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, मेहकर, डोणगाव, लोणार, सिंदखेड राजा या सर्वच शासकीय धान्य गोदामाकरीता स्वतंत्रपणे प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. यामध्ये प्रत्येक संस्थेने ठरवून दिलेल्या दरचा विचार करून सर्वात कमी दर असणाºया संस्थेचा कंत्राट निश्चित करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे. मुदतीत प्राप्त होणाºया प्रस्तावावर जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय समितीकडून निवडीची प्रक्रिया होईल. १६ गोदामावर हमाल कंत्राट निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १६ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. आता प्रथमच प्रत्येक गोदामनिहाय संस्थेकडून स्वतंत्र प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत.- गणेश बेल्लाळे,जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा