शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडणाऱ्या टोळीचा छडा लावण्याचे पाेलिसांसमाेर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 11:32 IST

Crime News : आता या तीन एटीएम फोडीमुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एकाच रात्री जिल्ह्यातील तीन एटीएम फोडून ५६ लाखांची रोकड पळविणाऱ्या टोळीचा माग काढण्याचे पोलीस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, या घटनेत दिल्ली, हरियाणाचे कनेक्शन तर नाही ना? याचीही शक्यता तपासण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनीही यासंदर्भाने संबंधित ठाणेदारांकडून आनुषंगिक माहिती घेत तपासाची दिशा निश्चित करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.विशेष म्हणजे चिखली-खामगाव या मार्गावरील तीन गावांतील स्टेट बँकेचे मात्र आऊट सोर्सिंगद्वारे दिले गेलेले एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातून तब्बल ५६ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. चिखलीनजीकचे शेलूद येथून २७ लाख २२१ रुपये, उंद्री येथील एटीएममधून ९ लाख ९६ हजार आणि पळशी येथील एटीएममधून १९ लाख रुपये ३० जुलै रोजीच्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्रासह, पोलीस प्रशासनातही खळबळ उडाली  आहे. विशेष म्हणजे मेहकर, लोणार तालुक्यातीलही एटीएम गेल्या वर्षी फोडण्याचा चोरट्यानी प्रयत्न केला होता. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो फसला होता. मात्र आता या तीन एटीएम फोडीमुळे सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. सायबर सेलचीही मदत यात घेतल्या जाणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणीया तिन्ही ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सध्या पोलीस करत आहेत. यातून एटीएम फोडणाऱ्या टोळीचे काही धागेदोरे मिळतात का? याची पाहणी सध्या पोलीस करत आहेत. तपासाच्या दृष्टीने काही बाबी अद्यापही पोलिसांनी गोपनीय ठेवलेल्या आहेत.

 टोळीवर नजरदिल्ली, हरियाणा राज्यातील सीमावर्ती भागात एटीएम फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. चोरट्यांची कार्यपद्धती पाहता या टोळीचे तर हे काम नाही ना? या दिशेनेही पोलिस तपास करत आहे. गुजरात-राजस्थान मधील एका टोळीने जिल्ह्यातून ट्रॅक्टर चोरीचा सपाटा लावला होता. त्याच धर्तीवर ही एटीएम फोडणारी टोळी तर जिल्ह्यात सक्रिय झाली का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.

स्टेट बँकेचे ४० पेक्षा अधिक एटीएमस्टेट बँकेअंतर्गत आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून जवळपास ४० पेक्षा अधिक एटीएम जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी एका व्यवस्थापकाचीही नियुक्ती केली गेली आहे. विशेष म्हणजे या एटीएमवर असलेले सुरक्षारक्षकही मधल्या काळात काढून घेण्यात आलेले आहेत. त्याचाच फायदा या टोळीने घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी