शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे कडकडीत बंद; सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:20 IST

चिखली : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानुषंगाने शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ बाबी वगळता रॅली व बंद शांततेत पार पडला.

ठळक मुद्देकोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ जिल्हाभर रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानुषंगाने शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ बाबी वगळता रॅली व बंद शांततेत पार पडला.कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी ३ जानेवारी रोजी सर्वपक्षीय बंद पाळण्यात येऊन यानिमित्ताने स्थानिक जयस्तंभ चौकापासून निषेध रॅली काढण्यात आली होती. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक व भीमप्रेमी जनतेचा मोठा सहभाग होता. बसस्थानक, डी.पी. रोड, आठवडी बाजार, राजा टॉवर, चिंच परिसर, बागवान गल्ली, न.प.समोरून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर फुले-आंबेडकर वाटिकेत या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली मार्गावरील महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी महामानवांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यात आले, तर वाटिकेत रॅली पोहोचल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदनेने सांगता करण्यात आली. यावेळी आमदार राहुल बोंद्रे, सुभाष राजपूत, मदनराजे गायकवाड, रफीक कुरेशी, पंडितराव देशमुख, डॉ.प्रकाश शिंगणे, अ.रऊफ, मो.असीफ, दत्ता सुसर, विलास कंटुले, सलीम मेमन, सुधीर चेके, समाधान गाडेकर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व भीमसैनिक तथा भीमप्रेमी जनतेचा सहभाग होता.  

किरकोळ बाबी वगळता बंद शांततेतशहरातील वैद्यकीय सेवा वगळता शहरातील सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली होती. त्यामुळे काही किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने हा शांततेत पार पडला. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयेदेखील बंद होते, तर चिखली आगारातील सर्व बसफेर्‍या रद्द केल्याने सर्व बस वर्कशॉपच्या मैदानात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आगारात दिवसभर शुकशुकाट होता, तर बंद व रॅलीदरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, डीवायएसपी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार महेंद्र देशमुख, पीएसआय प्रल्हाद मदन, तानाजी गव्हाणे, सुधाकर गवारगुरू, मोहन पाटील, प्रवीण सोनवणो, मनोज केदारे, एपीआय राऊत यांच्यासह जलद प्रतिसाद पथक व पोलीस कर्मचार्‍यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

दोघांना अटकबंददरम्यान बसस्थानक परिसरातील शिवम ड्रायव्हिंग स्कूल व काळे कन्सलटन्सी या कार्यालयातील सामानाची तोडफोड तर धनराज जोशी यांच्या हॉटेलमधील सामानाची नासधूस करून त्यांना व त्यांचे वडील मोहन जोशी यांना मारहाण झाल्याने धनराज जोशी यांचा खांदा निखळला. याशिवाय जवंजाळ दूध डेअरीचे मालक राजू जवंजाळ यांना मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अमोल भंडारे व निंबाजी विश्‍वनाथ रा.शेलुद यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ३२३, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यासह इतर काही किरकोळ बाबींवर पोलिसांनी तातडीने नियंत्रण मिळवून शहरातील शांतता अबाधित राखली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाBhima-koregaonभीमा-कोरेगावchikhali roadचिखली रोड