शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र-राज्य सरकारचे लावले लग्न; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 16:24 IST

Unique movement of Swabhimani Shetkari Sanghatana : राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा धिक्कार करीत या कार्यकर्त्यांनी चक्क केंद्र आणि राज्य सरकारचे लग्न लावून दिले.

सिंदखेड राजा : सोमवार असल्याने तहसील कार्यालयाचा परिसर गजबजलेला होता. जो तो आपल्या कामात मग्न असतानाच... अचानक मंगलवाद्यांचा स्वर कानावर आला आणि सर्वांचेच लक्ष एका अनोख्या आंदोलनाकडे वळले.. तहसील परिसरात चक्क एक लग्न लागत होते... वराती, वाजंत्री, नटलेले वर, वधू...आणि मंगलाष्टके असा सर्व थाट इथे होता.

कायमच आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या स्वाभिमनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथेही आज अनोखे आंदोलन केले. राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा धिक्कार करीत या कार्यकर्त्यांनी चक्क केंद्र आणि राज्य सरकारचे लग्न लावून दिले. लग्नानंतर ज्याप्रमाणे नवरा-नवरी एकत्र येऊन संसार करतात त्याचप्रमाणे दोन्ही सरकारांनी एकत्र येऊन शेकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचविण्याची हाक दिली.अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याची भरपाई सोडाच; पण पीकविमादेखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शेतकऱ्यांची ही थट्टा थांबवून तत्काळ मदत करावी, पीकविमा कंपन्या विमा देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले. पीकविम्याची वरात सरकारच्या दारात असे फलक घेऊन जिजाऊ जन्मस्थळापासून वाजतगाजत निघालेली ही वरात थेट तहसील कार्यालयात आणण्यात आली. येथे हा प्रतीकात्मक लग्नसोहळा पार पडला. यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाPoliticsराजकारणbuldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा