शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील स्मशानभूमी सोसताहेत मरणयातना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:28 IST

Chikhali News मृृतकांवर अंत्यसंस्कार नेमके करावे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

- सुधीर चेके पाटील     लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: तालुक्यातील स्मशानभूमींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, अनेक गावांत साधे टीनशेड अद्यापपर्यंत उभारले नाहीत. ज्या गावात टीनशेड आहेत, त्यातील अनेकांची खस्ता हालत आहे. अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहे की जंगल, असे दृश्य असल्याने मृृतकांवर अंत्यसंस्कार नेमके करावे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तालुक्यात १४३ गावे आहेत. त्यातील २५ गावांमध्ये अद्यापही स्मशानभूमीची व्यवस्थाच उभी झालेली नाही. ज्या गावांमध्ये टीनशेड आहे तिथे पुरेशा सुविधा नाहीत. स्मशानभूमींवरील निकृष्ट पत्रा व लोखंड भंगारात गेल्याने तालुक्यातील कित्येत स्मशानभूमींवर छप्परच नाही. ज्या काही मोजक्या गावात टीनशेडची अवस्था चांगली आहे तिथे संरक्षण भिंत, कूूंपन व योग्य देखभाल दुरूस्तीचा अभाव आहे. दाहिन्यांचे कठडे तुटलेले आहेत. अवतीभोवती झुडुप वाढलेली आहेत. पाण्याची व्यवस्था नाही. अनेक गावातील स्मशानभूमीत गावातीलच लोक शौचाला जातात. परिणामी परिणामी शेतांमध्ये, नदीकाठी उघड्यावर मृतांवर अत्यंसस्कार केले जातात. पावसाळ्यात अत्यंसस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. शहरातील स्मशानभूमींना बगिचासमान रूप येत असताना याउलट चित्र ग्रामीण भागात आहे. 

शेडची व्यवस्था नसलेली गावे अंत्री खेडेकर, बेराळा, पांढरदेव, मंगरूळ, मुंगसरी, सावरगाव डुकरे, बोरगाव वसु, पळसखेड जयंती, कोलारा, सावंगी गवळळी, किन्ही सवडद, भानखेड, जांभोरा, सवणा, असोला नाईक, मेडसिंगा, उत्रादा, टाकरखेड हेलगा, करवंड, अंत्री कोळी (वाघापूर), करणखेड, अमडापूर (बौध्द स्मशानभूमी), हरणी (मागासवर्गीय व हिंदु स्मशानभूमी), अंबाशी (मागासवर्गीय, मुस्लीम कब्रस्तान व हिंदु स्मशानभूमी), किन्ही नाईक, या गावात स्मशानभूमीची व्यवस्था नाही. तर काही गावात मुस्लीम कब्रस्थानची व्यवस्था नाही. शिवाय बहुतांश गावात धर्म व जातीव्यवस्थेनुसार स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी असूनही ती व्यवस्था अद्याप झालेली नाही. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाChikhliचिखली