शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट दरवाढीचा बांधकाम व्यवसायाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 14:44 IST

बुलडाणा: सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रती बॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सिमेंट कंपन्यांनी सिमेंटच्या दरात प्रती बॅग जवळपास ३० टक्के वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. दरम्यान, ही दरवाढ मागे घेण्याची ओरड बांधकाम व्यावसायिकांमधून होत असून प्रसंगी या विरोधात तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशारा क्रेडाईने दिला आहे.या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह, बांधकाम व्यावसायिक तथा मजूर वर्गावरही विपरीत परिणाम होत असल्याचे सांगितल्या जात आहे. सिमेंट कंपन्यांनी सिमेंट विक्री दरामध्ये अवास्वत वाढ केली असल्याचे क्रेडाई संघटनेचे म्हणे आहे. प्रकरणी क्रेडाईचे अध्यक्ष सुमीत सरदार, उपाध्यक्ष अविनाश सातपुते, मधुकर जोगंदड, एस. व्ही. कोलते, आतिक खान, श्याम सावळे, गोपाल पंडीत, गौरव टाकसाळ, तजीम मिर्झा, अतिश कस्तुरे, विजय खंडागळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांना याबाबत एक निेदनही दिले आहे.दरम्यन केंद्र शासनाने २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उद्देश या दरवाढीमुळे काही प्रमाणात अडचणीत आलेला आहे. सिमेंट दरवाढीमुळे केवळ बांधकाम व्यवसायच नव्हे तर मुलभूत व पायाभूत सुविधा पुरविणार्या व्यवसायावर ही विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जवळपास ११ टक्के योगदान बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून दिले जाते. सोबतच याच क्षेत्रात सध्या सर्वाधिक रोजगार असून सामान्य मजुराची उपजिविकाही या व्यवसायावर अवलंबून आहे.प्रकरणी ही दरवाढ मागे घेण्यात यावी तथा मजूर वर्गापासून व्यावसायिकांनाही दिलासा द्यावा, अन्था क्रेडाईकडून तीव्र आंदोलन छेण्यात येईल, असा इशारा क्रेडाईचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुमीत सरदरा यांनी दिला आहे.

गृहनिर्माण क्षेत्राच्या पतपुरवठ्यात ४२ टक्के वाढयंदाच्या वार्षिक पतआराखड्यात प्रथमच सात टक्के तरतूद ही गृहनिर्माण क्षेत्रासाठी करण्यात आली असून २६८ कोटी रुपये चालू आर्थिक वर्षात या क्षेत्रात पतपुरवठा करण्याचे बँकिंग सेक्टरचे उदिष्ट आहे. यंदा प्रथमच गृहनिर्माण क्षेत्रात पतआराखड्याच्यामध्ये उपरोक्त तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या आराखड्याच्या तुलनेत त्यात ४२ टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यातच आता सिमेंटच्या किंमतीत वाढ झाल्याने गृहनिर्माण क्षेत्राला याचा प्रामुख्याने फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामस्वरुप गतवर्षीच्या तुलनेत ४२ टक्के करण्यात आलेली वाढ कितपत या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

टॅग्स :buldhanaबुलडाणा