शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भावना जोपासत गणेशोत्सव साजरा करा - पोलिस उप महानिरिक्षक श्रीकांत तरवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 12:47 IST

सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याचीच खबरदारी युवकांनी घ्यावी, असे आवाहन पोलिस उप महानिरिक्षक श्रीकांत तरवडे यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  गणेशोत्सव हा नेतृत्व गुणाला संधी देणारा उत्सव असून, या उत्सवात युवकांनी आपल्या हातून कोणतेही गैरकृत्य घडणार नाही. या कृत्याद्वारे स्वत:च्या चारित्र्याला बट्टा लागणार नाही,  सोबतच सामाजिक स्वास्थ बिघडणार नाही, याचीच खबरदारी युवकांनी घ्यावी, असे आवाहन पोलिस उप महानिरिक्षक श्रीकांत तरवडे यांनी येथे केले.

बुलडाणा जिल्हा पोलिस गणेशोत्सव-२०१८ अंतर्गत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष-पदाधिकारी  शांतता समिती सदस्यांच्या समन्वय समिती बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे,  उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस उप महानिरिक्षक तरवडे म्हणाले की, सण उत्सवाच्या  कालावधीत सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केल्या जातात. मात्र, तरुणांनी कोणत्याही भूल थापांना बळी न पडता. सण, उत्सव आणि गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक एकोपा आणि शांतता अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. दरम्यान, मराठा आरक्षण मोर्चामुळे प्रलंबित असलेली ७२ हजार जागांसाठी मेगा भरती नजीकच्या कालावधीत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या कालावधीत नोकर भरतीची तयारी करणाºयांनी आपल्यावर गुन्हे दाखल होवून चारित्र्याला कलंक लागणार नाही. याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी शरद वसतकार, दर्शनसिंह ठाकूर, गजाननराव देशमुख, अनिस जमादार, अमोल अंधारे यांची समयोचित भाषणे झालीत. प्रास्ताविक अप्पर पोलिस अधिक्षक श्याम घुगे यांनी केले. संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक प्रदीप देशमुख यांनी केले. आभार उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी मानले. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक रफीक शेख, पीएसआय रविंद्र लांडे, कांबळे, माने आदींची उपस्थिती होती. 

सहकार्य भावनेतून सलोखा जोपासा!

- संवेदनशील शहर म्हणून खामगावकडे पाहल्या जात असले तरी, गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार खामगावात या उत्सवाच्या कालावधीत घडला नाही. ही प्रेरणादायी बाब असून, सहकार्य भावनेतून सामाजिक सलोखा जोपासा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ यांनी केले.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस