शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या वीज तारेची विक्री पकडली, सहा जणांकडून मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा

By अनिल गवई | Updated: May 6, 2024 17:17 IST

परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १२ जणांविरोधात गुन्हा.

अनिल गवई,खामगाव : चोरीच्या वीज तारेची विक्री करताना पकडून फोटो काढल्याने एकास सहा जणांनी धारदार शस्त्राने मारहाण केली. ही घटना रविवारी उशिरा रात्री स्थानिक टिळक मैदान परिसरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही गटांतील १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारीनुसार, अब्दुल रहमान अब्दुल सत्तार (५४) यांना टिळक मैदानावरील एका दुकानात चोरीच्या वीज तारेची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाळत ठेवून छायाचित्र संकलित केले. त्यामुळे चिडून जात जफर खान सत्तार खान, अजिम खान फिरोज खान, मुजफ्फर खान सत्तार खान या तिघांनी मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटत पळ काढल्यानंतर जफर खान सत्तार खान, अजिम खान फिरोज खान, मुजफ्फर खान सत्तार खान, हसनैन खान जफर खान, जुनैन खान जफर खान, आफताफ खान फिरोज खान पाठलाग करीत असताना एका डेअरीजवळ थांबले. 

आरोपीही तेथे आले. त्यावेळी फिर्यादीचा भाऊ मोहम्मद सादिक अब्दुल गफ्फार, मुलगा मोहम्मद सालीम अब्दुल रहमान, जुलेखां बानो अब्दुल रहमान यांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही आरोपींनी मारहाण केली. यात मुलगा मोहम्मद सालीम अब्दुल रहमान यास मुजफ्फर खान सत्तार खान याने तर अजिम खान फिरोज खान याने मुलाच्या डाव्या पायावर पाइप मारून त्यास जखमी केले. त्याचवेळी भावाला जुनैन खान जफर खान याने छातीवर काठीने मारले. तसेच हसनैन खान जफर खान, आफताफ खान फिरोज खान यांनी फिर्यादीसोबतच त्यांच्या पत्नीला मारहाण करून  दुकानातील गल्ल्याचे २२ हजार आठशे रुपये शर्टाचा खिसा फाडून काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सहा जणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३२४, १४१, १४३, १४७, १४९ सहकलम ३७ (१) (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. 

पैशांच्या व्याजासाठी मारहाण-

त्याचवेळी जफर खान सत्तार खान (५२) यांनी तक्रार दिली. त्यामध्ये त्यांच्या मुलाने अ. रहमान अ.सत्तार यांच्याकडून मोबाइल घेण्यासाठी व्याजाने पैसे घेतले. या पैशांच्या व्याजासाठी अब्दुल रहमान अब्दुल सत्तार, सादीक मेमन गफ्फार मेमन, सालीम मेमन रहमान मेमन, रिजवान पटेल, फैजान मेमन अब्दुल रहमान, दानीश मेमन सादीक मेमन यांनी संगनमत करून शिवीगाळ व मारहाण केली. तर, सादीक मेमन गफ्फार मेमन, सालीम मेमन रहमान मेमन, रिजवान पटेल या तिघांनी लोखंडी सळईने हल्ला चढविला. त्याचवेळी फैजान मेमन अब्दुल रहमान आणि दानीश मेमन सादीक मेमन या दोघांनी पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतल्याचा आरोप तक्रारीत केला. त्यावरून पोलीसांनी सहा जणांविरोधात भादंवि कलम ३९२, ३२४, १४१, १४३, १४७, १४९, सहकलम ३७ (१) (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार सोमवारी पहाटे गुन्हा दाखल केला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस