शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये काेंबून गुरांची चाेरी, पाेलिसांनी पाठलाग करून पकडले

By संदीप वानखेडे | Updated: July 10, 2024 17:41 IST

तीन गायींसह कार जप्त : उपविभागीय पाेलिसांच्या पथकाची कारवाई

बुलढाणा : महागड्या कारमध्ये काेंबून गुरांची चाेरी करण्याचा प्रयत्न उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांच्या पथकामुळे फसला़ पाेलिसांना पाहताच चाेरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला़ पाेलिसांनी पाठलाग करून तीन गायींसह कार जप्त केली. बुलढाणा शहरातील त्रिशरण चाैकात पाेलिसांनी ही कारवाई १० जुलै राेजी केली.

बुलढाणा शहरातील कारंजा चाैकातून चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार क्रमांक एमएच ०५ एएक्स १२१३ मध्ये गुरे काेंबून लंपास करण्यात येत हाेते. यावेळी गस्तीवर असलेल्या उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांच्या पथकाच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला. हे वाहन कारंजा चौक, एडेड चौक मार्गे चिखलीच्या दिशेने वेगाने धावत होते. पोलिसांचा पाठलाग सुरू हाेता. शेवटी कार त्रिशरण चाैकात साेडून तीन ते चार चाेरट्यांनी तेथून पळ काढला.

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात तीन गायी निर्दयीपणे कोंबून नेल्या जात असल्याचे निदर्शनास आले. या गायी चोरून नेल्या जात असतील असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष बाब म्हणजे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील स्वत:या कारवाईत सहभागी होते. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकासह तीन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मध्ये एएसआय सुधाकर तारकसे, सतीश राठोड, संदीप मोधे, राजू जाधव सहभागी होते. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव खवले हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी