शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

बोगस सोयाबीन बियाण्यांची प्रकरणे न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 11:07 IST

बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : चालू खरिप हंगामात सोयाबिन बियाण्यांची पेरणी केल्यानंतर त्याची उगवणच झाली नसल्याच्या हजारो तक्रारी कृषी विभागाकडे झाल्यानंतर बियाणे उत्पादक कंपन्यांकडून त्याची भरपाईचा आदेश देण्यात आला. त्यानंतर शेती उगवण परिस्थितीचा पंचनामा केलेल्या समितीमधील कृषी विभागाचे निरिक्षकाने याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा आदेशही विभगीय कृषी सहसंचालकांनी पाचही जिल्ह्यातील अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे आता बियाणे कंपन्यांना न्यायालयात खेचून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सोयाबिन उत्पादक पट्ट्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी झाल्या. वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील शेतकºयांचा यात समावेश आहे. ब्महाबीजचे बियाणे न उगवलेल्या शेतकºयांना तातडीने बियाणे देण्याचा आदेश कृषी विभागाने राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना २३ जून रोजी दिला. त्यापैकी काहींना बियाणे देण्यात आले. तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याने नियुक्त केलेल्या समितीकडून पंचनामेही करण्यात आले. शेकडो शेतातील बियाणे सदोष असल्याचे तसेच बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे अहवालही देण्यात आले. सुरूवातीला त्या सदोष बियाण्यांबाबत शेतकºयांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला कृषी विभागाने दिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. बोगस बियाणे देणाºया कंपन्यांवरही कारवाईची मागणी झाली. त्यामुळे कृषी विभागाने आता निरिक्षकांना बोगस बियाणे प्रकरणात पंचनाम्यासह न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, शेतकरी वैयक्तिकपणेही दाद मागू शकतो. तर कृषी विभागाचे निरिक्षकही उत्पादक कंपनीविरूद्ध दावा दाखल करणार आहेत. ही प्रक्रीया तातडीने करण्याचा आदेश विभागीय सहसंचालकांनी दिला आहे.

आता तक्रारी घेणे बंदपेरणीला एक महिना आटोपल्याने आता बियाण्यांच्या उगवण क्षमतेबाबत तक्रारी स्वीकारता येणार नाहीत, याकडेही जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाºयांचे आता लक्ष वेधल्या गेले आहे.

प्रत्येक निरिक्षक दाखल करणार प्रकरणसहसंचालकांच्या आदेशानुसार तालुकास्तरीय समितीमधील प्रत्येक निरिक्षक पंचनाम्यानुसार न्यायालयात प्रकरण दाखल करणार आहे. त्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावFarmerशेतकरीCourtन्यायालयAgriculture Sectorशेती क्षेत्र