शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस रुग्णालयातील चोरीचा दहा दिवसांनतर गुन्हा दाखल

By भगवान वानखेडे | Updated: March 21, 2023 12:35 IST

साडेतीन हजार रुपयांच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दहा दिवसांची पाहली वाट

बुलढाणा : येथील पोलीस रुग्णालयातील काही साहित्य अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. ही घटना १० ते ११ मार्च दरम्यान घडली होती. याबाबत तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने तक्रारही दिली. मात्र, प्रकरणात तब्बल १० दिवसानंतर २० मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस रुग्णालयात कार्यरत असलेले प्रमोद मधुकर कुळकर्णी (५६) यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, ते जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस रुग्णालयात १९९८ पासून कार्यरत आहेत. ते १० मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता हॉस्पीटल बंद करुन घरी गेले होते. ११ मार्च रोजी सकाळी ड्युटीवर आले असता त्यांना हॉस्पीटलचे कुलुप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहले असता हॉस्पीटलमधील इन्व्हटरची बॅटरी, दोन जुने स्टॅंड पंखे, जुनी पितळी पाण्याची टाकी आणि जुन्या वापरातील प्लास्टिकच्या खुर्च्या असे एकुण ३ हजार ६०० रुपयांचे साहित्य चोरीला गेले होते. याप्रकरणात २० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अज्ञात महिला

शहर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलीस रुग्णालयात चोरीप्रकरणात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक तर दहा दिवसानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून, तपासाची गतीही मंदावल्याचे दिसून येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी