शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने दुचाकीला उडविले; पिता-पूत्र जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:34 IST

अंबादास सुभाष रिंढे (४१) हे पत्नी दीपाली (३५) व मुलगा कार्तिक (५) असे तिघेजण सोमवारी रात्री सासरवाडी बोरगाव काकडे येथे गेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर/शेलसूर : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली. चिखली- अमडापूर मार्गावरील दहीगाव फाट्याजवळ १२ मे रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. कारचालक घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेलसूर येथील अंबादास सुभाष रिंढे (४१) हे पत्नी दीपाली (३५) व मुलगा कार्तिक (५) असे तिघेजण सोमवारी रात्री सासरवाडी बोरगाव काकडे येथे गेले होते. सासरवाडीत मुक्काम करुन सकाळी एम-एच-२८-एम-६३०० क्रमांकाच्या दुचाकीने उंद्री येथे जात होते. दरम्यान दहिगाव फाट्याजवळ एम-एच-२८-ए-झेड-३९२६ क्रमांकाच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये अंबादास रिंढे व मुलगा कार्तिक ठार झाले. तर पत्नी दीपाली गंभीर जखमी झाली.अपघाताची माहिती मिळताच अमडापूर ठाणेदार अमित वानखडे यांच्या मार्गदर्शनात एएसआय लक्ष्मण टेकाळे, वैद्य घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमीवर चिखली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुचाकीला धडक देणाऱ्या कारचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याच्याविरुद्ध अमडापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृतक सहकार विद्या मंदिरवर होते लिपीकअपघातातील मृतक अंबादास रिंढे हे मूळचे शेलसूर येथील रहिवासी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते उंद्री येथील सहकार विद्या मंदिरवरमध्ये लिपीक म्हणून कार्यरत होते. तसेच उंद्री येथे त्यांचे टायपिंग इन्स्टिट्यूट होते. पत्नी, मुलगी व मुलासह ते उंद्री येथे राहत होते. मंगळवारी झालेल्या अपघातात ते व त्यांच्या मुलावर काळाने झडप घातली. मृतांवर शेलसूर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अपघाती निधनाने रिंढे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात