सुलतानपुर : भरधाव कार पुलावरून नदीपात्रात काेसळल्याने दाेन युवक जागीच ठार तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ४ नाेव्हेंबर राेजी घडली. याेगेश दत्ता अंभाेरे व अजय शंकर इंगाेले रा.वाशिम असे मृतक युवकांची नावे आहेत. वाशिम येथील चार युवक कार क्रमांक एमएच ३२ एएच ४३६९ ने पुणे येथे जात हाेते. दरम्यान, लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील राज्यमहामार्गावरील सितान्हाणी पुलाच्या वळण मार्गावर ही कार ५० फुट नादित काेसळली. यामध्ये योगेश दत्ता अंभोरे व अजय शंकर इंगोले हे जागीच ठार झाले तर तर गणेश रमेश वाघ व ऋषीकेश दत्तात्र्य अदमाणे हे गंभीर जखमी झाले आहेत. मागील तिन वर्षापासुन पंढरपुर - शेगांव पालखी मार्गाचे काम सुरु असून अपघात स्थळ जवळील नदिपुलाजवळील काम करणे बाकी आहे. महामार्गावर कुठल्याही प्रकारचे सुचना फलक नसल्याने वाहन चालकास रसत्याचा अदाज येत नसल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.
भरधाव कार नदीपात्रात काेसळली; दाेन ठार, दाेन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:52 IST
Buldhana Accident News दत्ता अंभाेरे व अजय शंकर इंगाेले रा.वाशिम असे मृतक युवकांची नावे आहेत.
भरधाव कार नदीपात्रात काेसळली; दाेन ठार, दाेन गंभीर
ठळक मुद्देपुलाच्या वळण मार्गावर ही कार ५० फुट नादित काेसळली.गणेश रमेश वाघ व ऋषीकेश दत्तात्र्य अदमाणे हे गंभीर जखमी झाले आहेत.