शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, ३ ठार ७ जखमी; घर २ किमीवर असतानाच अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 11:38 IST

शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली.

बुलडाणा - रस्ते महामार्गांचा विकास साधून अपघात टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, वाहनांची वाढती संख्या, वाढीव वाहतूक आणि हायस्पीड प्रवासामुळे अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येते. आता, पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या शेगावातील भाविकांच्या वाहनाला परत येत असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळ मोठा अपघात घडला. 

शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ आज सकाळी सहाच्या सुमारास भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली. या अपघातामध्ये ३ भाविक जागीच ठार झाले तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले. तर, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अकोल्यात हलवण्यात आले आहे. क्रुझर चालकाला झोप लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले अन् हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारण, रात्री पासून या गाडीचा प्रवास सुरु होता. विशेष म्हणजे पीडित कुटुंबीय हे त्यांच्या घरापासून अवघ्या २ किलो मीटर  अंतरावर असतानाच हा अपघात झाला.

दरम्यान, मृतक व जखमी चिचखेड, मच्छिंद्रखेड येथील आहेत. यामध्ये पूर्वी नितीन ठाकरे 23,परशुराम  लांजुळकर वय 30 रा आळसणा,सुनंदा गजानन झोटे वय 41 हे जागीच ठार झाले. तसेच स्वामिनी हरिदास भारंबे वय 24 रा मच्छिंद्रखेड, शितल अक्षय भारंबे 30 ,प्रांजली दत्तात्रय पारस्कार सावळा, सागर विलास साठे30 तरोडा डी, शुभागी सागर झाटे ,ज्योती ज्ञानेश्वर भारंबे 39 मच्छिंद्रखेड ज्ञानेश्वर वसंता भारंबे30 मच्छिंद्रखेड, ओवी अक्षय भारंबे 1, श्लोक नितिन ठाकरे 13 , योगीराज सागर घाटे वय 2 ,सार्थक अक्षय भारंबे 6,अक्षय वसंत भारंबे 38 मच्छिंद्रखेड, नितिन ठाकरे 35  कोदरी,जिजाबाई वसंता भारंबे 45 मच्छिंद्रखेड , प्रमिला पाटील 45 टाकळी हे जखमी झाले.  

जखमी पैकी तिघाची प्रकृती चिंताजनक आहे. मच्छिंद्रखेड, तरोडा डी येथील भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर, तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शनाहंन घराकडे परतले असता शेगाव जवळ वाहनाचा अपघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाShegaonशेगावhospitalहॉस्पिटल