शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात होणार निवडणुकीचे मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:02 IST

बुलडाणा: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी काँग्रेसने जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. बुलडाण्यात येत्या ६ एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबिर होण्याची शक्यता असून, या शिबिरामध्ये निवडणुकीसंदर्भात मंथन होणार आहे. 

ठळक मुद्दे६ एप्रिल रोजी शिबिर होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आगामी निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करून निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी काँग्रेसने जिल्हानिहाय शिबिरांचे आयोजन केले आहे. बुलडाण्यात येत्या ६ एप्रिल रोजी प्रशिक्षण शिबिर होण्याची शक्यता असून, या शिबिरामध्ये निवडणुकीसंदर्भात मंथन होणार आहे.  विदर्भातील प्रशिक्षण शिबिरांची २३ मार्चपासून सुरुवात झाली आहे. अमरावती, यवतमाळ व अकोल्यानंतर आता बुलडाण्यात शिबिर होऊ घातले आहे. या शिबिरात  काँग्रेसचे अ. भा. सरचिटणीस मोहनप्रकाश, माजी खा. मुकुल वासनिक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील, विश्‍वजित कदम, चारुलता टोकस, नाना पटोले, अनंतराव देशमुख, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ व शिबिराच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे श्याम उमाळकर आदी नेत्यांच्या उपस्थित प्रशिक्षण शिबिर होत आहे.  या प्रशिक्षण शिबिरात मतदारसंघनिहाय काँग्रेसची स्थिती व संभाव्य रणनीती यावरही चर्चा होणार असल्याने आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना दिशा मिळणार आहे.

मराठवाडा, विदर्भातील शिबिरांची सूत्रे श्याम उमाळकर यांच्या हाती बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष श्याम उमाळकर यांची शिबिरांच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ठाणे, मराठवाडा विभागासह विदर्भातील शिबिरांपैकी सहा शिबिरांचे सूत्रसंचालन तसेच वक्त्यांचे विषय ठरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रशिक्षण शिबिर हे शिबिरासारखेच झाले पाहिजे त्याचा मेळावा होऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष खा. चव्हाण यांनी उमाळकर यांच्यावर जबाबदारी टाकली आहे. शिबिरात मान्यवर नेत्यांचा प्रोटोकॉल कायम ठेवत शिबिरात येणार्‍या प्रत्येक पदाधिकार्‍याच्या शंकाचे निरसन होईल, अशी रचना शिबिराची करण्यात उमाळकर यांचा मोठा वाटा आहे.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाcongressकाँग्रेस