जळगाव जामोद ( जि. बुलडाणा): वार्षिक ३0 लाख रुपयांची कामे करण्याचे पात्रताधारक कंत्राटदार असताना खोटे शपथपत्रक देऊन कमी उत्पन्नाचा दाखला मिळवून आर्थिक दुर्बल मतदारसंघातून उमेदवारी केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. सुनील शुक्रे यांच्या पीठाने निवडणूक अधिकारी आणि उमेदवार गजानन सरोदे यांना नोटीस काढून पुढील सुनवाणी २२ एप्रिलला ठेवली आहे. जळगाव जामोद बाजार समितीच्या १८ जागांची निवडणूक २६ एप्रिलला होऊ घा तली आहे. त्यापैकी एक जागेवर ग्रामपंचायत मतदारसंघातून एक आर्थिक दुर्बल घटकातून उमेदवार निवडून द्यावयाचा आहे. नियमानुसार वीस हजारपेक्षा कमी उत् पन्न असलेल्या व्यक्तीला या मतदारसंघातून निवडणूक लढविता येते. त्याकरिता उमेदवार गजानन सरोदे यांनी ११ मार्च रोजी तहसीलदार जळगाव जामोद यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला मिळविण्याकरिता अर्ज केला होता. त्या सोबत त्यांच्याकडे शेती नसून, ते शेतमजूर असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न २0 हजार असल्याबाबत शपथपत्र दारिद्रय़रेषेचे कार्डसुद्धा दिले होते. त्या आधारावर तहसीलदार यांनी २0 हजार उत्पन्नाचा दाखला दिला होता; परंतु पुन्हा १३ मार्चला ते शेतकरी असल्याबाबत शपथपत्र देऊन तहसीलदार यांच्याकडून शेतकरी असल्याबाबत प्रमाणपत्रसुद्धा घेतले होते; परंतु सरोदे हे शासनाकडे नोंदणीकृत कंत्राटदार असून, ३0 लाखांपर्यंत कामे करण्याची पात्रता असून, २0१३-१४ या वर्षात त्यांनी १५ लाखाच्यावर कामे केली असून, ३५१२५ उत्पन्न कर आणि तेवढाच मूल्य वर्धित कर भरल्याचे नमूद केले आहे. त्यांचे उत्पन्न हे र्मयादेपेक्षा जास्त असल्याने त्यांची उमेदवारी बेकायदशीर असल्याचे आरोप अशोक भाऊराव दळवी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अँड प्रदीप क्षीरसागर पाटील यांच्यामार्फत याचिकेद्वारे केला आहे. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीनंतर नोटीस काढून पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी ठेवण्यात आली.
खोटे उत्पन्न दाखवून आर्थिक दुर्बल गटात उमेदवारी
By admin | Updated: April 18, 2015 02:06 IST