शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी खामगावात धडक मोहिम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:31 IST

Khamgaon News बेशिस्त वाहतुकीला वळण लावण्यासाठी खामगावात धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेमुळे  वाहतूक कोंडी आणि अपघात वाढीस लागल्याचे निदर्शनास येताच पोलिस प्रशासनाकडून १ फेब्रुवारीपासून खामगाव शहरात धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान वाहन जप्तीसोबतच कठोर कारवाईचेही स्पष्ट निर्देश अपर पोलिस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी येथे दिले.खामगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न राहील आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, किरकोळ साहित्य विक्रेते आणि चहा नास्त्यांच्या दुकानांसमोरील गर्दीसोबतच अवैध पार्कींग संदर्भातही पोलीस प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला आहे. मोहिमेदरम्यान, पोलीस प्रशासनाला असहकार्य करणाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्यासोबतच वाहन जप्तीचीही कारवाई केली जाणार असल्याचे अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी स्पष्ट केले. या पत्र परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल हुड, वाहतूक शाखेचे भामोदकर आदींची उपस्थिती होती.

 जड वाहतुकीला निर्बंध!वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरातील जड वाहतुकीलाही निर्बंध घालण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहतुकीस मज्जाव राहील. या कालावधीत जड वाहतूक करणाºयांवाहनासोबतच संबंधित व्यावसायिकांवरही कारवाई केली जाईल.

वाहतूक कोंडीचे  साक्षीदारशहरातील सरकी लाईन भागातील वाहतूक कोंडीचे आपण स्वत: आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी साक्षीदार असल्याचे अपर पोलीस अधिक्षक हेमराजसिंह राजपूत यांनी यावेळी स्पष्ट केले. बुलडाणा बैठकीला जाताना सरकी लाइन भागात आपण अनेकदा वाहतूक कोंडीत अडकल्याची कबुलीही राजपूत यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :khamgaonखामगावTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस