बुलडाणा : तालुक्यातील हतेडी येथे अज्ञात चाेरट्यांनी अडीच लाखांचा एवज लंपास केल्याची घटना ३ ऑगस्ट राेजी उघडकीस आली़. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़.हतेडी येथील प्रशांत सिताराम चव्हाण हे २ ऑगस्ट रात्री घरात झाेपलेले असताना अज्ञात चाेरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला़. तसेच घरातील दुचाकी एमएच २८ बीएफ १६३० किंमत ५० हजार, लाेखंडी पेटीतील १ लाख ५० हजार,साेन्याचे दागीणे किंमत ५० हजार व इतर असा २ लाख ५४ हजार रुपयांचा एवज लंपास केला़. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा ग्रामीण पाेलीस करीत आहेत़.
हतेडी येथे घरफाेडी; अडीच लाखांचा एवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 18:04 IST