लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरातील एकता नगरमध्ये झालेल्या घडफोडीत अज्ञात चोरट्यांनी २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. शहरात सध्या घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.येथील नीलेश गवळी हे कामानिमित्त बाहेर गेले होते तर त्यांची पत्नी ही अैारंगाबाद येथे गेली हाेती. शनिवारी रात्री ११ वाजता ते घरी परत आले असता घराचा कडीकोंडा तोडलेला त्यांना आढळून आला. आत गेल्यानंतर पाहणी केली असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस तपासात २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आल्याचे समोर आले. त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. एपीआय अभिजित अहिरराव व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शहरता घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.
बुलडाण्यात पुन्हा घरफोडी; दोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:29 IST