शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश आवाजात बुलेट चालविणे अंगलट; पोलिसांची कारवाई

By अनिल गवई | Updated: March 14, 2023 20:12 IST

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त तसेच कर्णकर्कश आवाज करून वाहने चालविणाऱ्या २० वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

खामगाव- कर्णकर्कश आवाजात बुलेट चालविणे दोन बुलेट स्वारांच्या अंगलट आले. शहर पोलीसांच्या कारवाईनंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने संबंधितांना १८५०० रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे खामगाव शहरातील बेशिस्त वाहन धारकांसोबतच वाहनाच्या सायलेंसरमध्ये छेडछाड करून वाहन चालविणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एमएच २८ एएक्स ३०३० क्रमांकाच्या बुलेट स्वाराला साडे आठ हजार रूपये तर एमएच २८ १७८७ क्रमांकाच्या बुलेट मालकाला दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या, बेशिस्त तसेच कर्णकर्कश आवाज करून वाहने चालविणाऱ्या २० वाहन चालकांवर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अमोल कोळी आणि शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक शांती कुमार पाटील यांनी वाहनांची तपासणी केली. संबंधित वाहन चालकाविरोधात शहर पोलिस स्टेशनमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

शहर पोलिस स्टेशन हद्दीतील जलंब नाका, दीपाली नगर, अमृत नगर या परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान ट्रिपलसिट दुचाकी चालविणे, सुसाट गाडया पळविणे, विना लायसन्स दुचाकी चालविणे, कर्कश आवाजात हॉर्न वाजविणे, फटाक्याच्या आवाजाचे बुलेट चालविणे अशा २० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर यापैकी ३ बुलेट ठाण्यात लावण्यात आल्या आहेत. तीन पैकी दोन बुलेट स्वारांच्या कर्णकर्कश आवाजात बुलटे चालविणे अंगलट आले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस