शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: ‘समृद्धी’वर सहा तासांत दोन अपघातात दोन मृत्युमुखी, ११ जखमी

By निलेश जोशी | Updated: November 9, 2023 19:33 IST

Accident: समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक फर्दापूर ते डोणगाव दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा तासाच्या अंतरात दोन अपघात होऊन दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतकापैकी एकाची अेाळख पटली आहे.

- नीलेश जोशीडोणगाव/ मलकापूर पांग्रा: समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक फर्दापूर ते डोणगाव दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा तासाच्या अंतरात दोन अपघात होऊन दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतकापैकी एकाची अेाळख पटली आहे. जखमींवर मेहकरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. गंभीर जखमीमध्ये एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. पहिला अपघात खासगी प्रवासी बस व ट्रकमध्ये तर दुसरा अपघात वेग मयादा अेालांडून धावणाऱ्या कारला झाला आहे.

पहिला अपघात हा फर्दापूर टोल नाक्याजवळ पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. चाकातील हवा खासगी बस चालक तपासत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला पाठीमागील बाजूने जबर धडक दिली. त्यात बस चालकासह एक प्रवाशी ठार झाला तर सहा जण जखमी झाले होते. हरीश ठाकरे हे मृत बसचालकाचे नाव असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या मृतकाची मात्र अेाळख पटलेली नाही. दरम्यान या प्रवाशी बसमधील बाकी ३६ प्रवाशी सुरक्षीत आहेत. जखमी सात जणांंवर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.

एमएच-१४-एचजी-५९९९ क्रमांकाची ही खासगी प्रवाशी बस ही मुंबईकडून नागपूरकडे जात होती. चाकातील हवा कमी झाल्याचा संशय आल्याने चालकाने महामार्गाच्या कडेला बस उभी करून तपासणी करत असतानाच पाठीमागून येणाऱ्या ट्रकने बसला जबर धडक दिली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिस व बचाव पथकाने तातडीने घटनास्थळ गाठत जखमी रुग्णांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. एका प्रवाशाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. अन्य प्रवाशी किरकोळ जखमी झाले होते.

चुकीच्या ठिकाणी वाहन थांबविलेमहामार्गावर चुकीच्या ठिकाणी बस थांबविल्यामुळे हा अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. योग्य ठिकाणी बस थांबवली असती तर दुर्घटना टळली असती.

चालकाचे नियंत्रण सुटून कारला अपघातपहिल्या अपघातानंतर सकाळी ११ वाजेच्या सुमारास नागपूरकडे जाणाऱ्या एका भरधाव वेगातील कारचे टायर फूटून रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्याला ही कार धडकली. त्याच पाच जण जखमी झाले आहेत. यातील अडीच वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर असून त्यास नागपूर येथे हलविण्यात आले आहे. डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. जखमीमध्ये सुवर्णा चंद्रशेखर शेलोरे (२८), चंद्रशेखर गजानन शेलोरे (३०) कुणाल अरूण ठाकरे, शिवांश चंद्रशेखर शेलोरे (अडीच वर्ष, सर्व रा. नागपूर) आणि भुपेंद्र युवराज पटेले (रा. पुणी, बालाघाट, मध्यप्रदेश) अशी जखमींनी नावे आहेत. यातील शिवांश चंद्रशेखर शेलोरे हा अडीच वर्षाचा मुलाची प्रकृती अत्यवस्थ आहे. मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार डोणगाव येथील ठाणेदार अमरनाथ नागरे व सहकाऱ्यांनी समृद्धी महामार्ग गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले होते.

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गbuldhanaबुलडाणा