शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

‘समृद्धी’साठी सरळ खरेदीने जमीन घेण्यात बुलडाणा राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 22:20 IST

विदर्भ आणि मुंबईला जोडणार्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या सात हजार २९० हेक्टर जमिनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे २८ जून पर्यंत संपादन झाले आहे.

 - नीलेश जोशीबुलडाणा  - विदर्भ आणि मुंबईला जोडणार्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या सात हजार २९० हेक्टर जमिनीपैकी सहाहजार ५७ हेक्टर जमिनीचे २८ जून पर्यंत संपादन झाले आहे. सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करून बुलडाणा जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आता अवघे १३६ हेक्टर क्षेत्र संपादीत करावयाचे राहले आहे.विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग थेट मुंबईला समृद्धी महामार्गाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा मार्ग पुर्णत्वास गेल्यावर नागपूर-मुंबईचे अंतर कमी होऊन शेतकर्यांना थेट मुंबईमध्ये माल पोहोचवण्यासोबतच बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा, जालना, ठाणे, अहमदनगरसहबहुतांश जिल्ह्यांच्या विकासाला तथा औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.त्यामुळे या प्रकल्पावर मोठा जोर दिल्या गेला आहे.जमीन संपादनाची टक्केवारी पाहता वाशिम जिल्हा राज्यात अव्वल असून ९२ टक्के जमीन या जिल्ह्यात संपादीत झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८८ टक्के, नाशिक जिल्ह्यात ७७ टक्के, अमरावती जिल्ह्यात ९० टक्के, वर्धाजिल्ह्यात ८७ टक्के, ठाणे जिल्ह्यात ७४ टक्के, जालना ७७ टक्के, अहमदनगर ८५ टक्के आणि नागपूर जिल्ह्यातील ९३ टक्के जमीन समृद्धीसाठी संपादीत केली गेली आहे.

बुलडाण्यात सर्वाधिक खरेदीएकट्या बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ८०६ खरेदया या सरळ खरेदीद्वारे झाल्या आहेत. त्यानंतर औरंगाबादमध्ये एक हजार ७५१ जणांच्या खरेदया झाल्या असून नाशिक जिल्ह्यामध्ये एक हजार ५८३जणांच्या जमिनीच्या सरळ खरेदी झाल्या आहेत. दहाही जिल्ह्यात आजपर्यंत १० हजार ५३० जणांची जमीन थेट खरेदीदर संपादीत करण्यात आली आहे.समृद्धी महामार्गासाठी सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमिनीचे बुलडाणा जिल्ह्यात भूसंपादन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात बुलडाणा जिल्हाअग्रस्थानी स्थानी आहे.- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गbuldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्र