शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

हृदयद्रावक! बहिणीला भेटून जात असताना दुचाकीला भीषण अपघात, तीन भावांचा जागीच मृत्यू

By विवेक चांदुरकर | Updated: August 9, 2023 22:50 IST

Buldhana Accident News: नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीने अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन सख्खे तर एका चुलत भावाचा घटना स्थळावरच मृत्यू झाला.

- विवेक चांदूरकर नांदुरा- मलकापूर (बुलढाणा) : नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीने अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन सख्खे तर एका चुलत भावाचा घटना स्थळावरच मृत्यू झाला.

मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील तिघे चुलत भाऊ अनोराबाद येथून आंबोला जात असताना एमएच २८ बीएन २७३९ क्रमाकांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये उमेश विठ्ठल कांढरकर (२३), प्रशांत किसन कांढरकर (२३), नितीन किसन कांढरकर (२६) यांचा जागीच मृत्यू झाला. किसन कांढरकर यांना दोन मुले होते. दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला. मृतक तिघेही अविवाहीत होते. अपघाताची माहिती मिळतात ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, आश्विन फेरण, कृष्णा वसोकार, आनंद वावगे, अजय गवई, राजू बगाडे रुग्णवाहिकेसह घटनास्थळी हजर झाले. अपघातग्रस्तांना रूग्णवाहिकेव्दारे त्यांच्या घरी नेण्यात आले. आमदार राजेश शेकडे यांनी घटनास`थळावर तात्काळ मदत उपलब्ध करून दिली.

बहिणीला भेटून गावी जात होते परतमलकापूर तालुक्यातील झोडगा येथील कंडारकर कुटुंबातील तीन चुलत भावंड बहिणीच्या भेटीसाठी गेले होते. ९ आॅगस्ट रोजी रात्री तीघे जण स्वगृही परतीच्या वाटेवर निघाले होते. मलकापूर - खामगाव राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा उड्डाणपूलानजीक ट्दुचाकीचा भिषण अपघात झाला.

टॅग्स :AccidentअपघातbuldhanaबुलडाणाFamilyपरिवार