शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बुलडाणा : ओबीसीची ६.२५ कोटींची शिष्यवृत्ती थकीत; विद्यार्थ्यांसमोर आर्थिक पेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:57 IST

बुलडाणा : इतर मागास प्रवर्गातील ७ हजार ८९२ विद्यार्थ्यांची २0१५-१६ व २0१६-१७ या शैक्षणिक सत्रातील सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांची भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती रखडल्याने त्यांच्यासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. शासनाने त्वरित निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. 

ठळक मुद्देलवकर निधी मंजूर होण्याची गरज 

सोहम घाडगे । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : इतर मागास प्रवर्गातील ७ हजार ८९२ विद्यार्थ्यांची २0१५-१६ व २0१६-१७ या शैक्षणिक सत्रातील सुमारे सव्वा सहा कोटी रुपयांची भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती रखडल्याने त्यांच्यासमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. शासनाने त्वरित निधी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती, विजाभज, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर  शिष्यवृत्ती दिली जाते. गतवर्षी  जिल्ह्यातील ३५१ महाविद्यालयातील ५३ हजार १३२ विद्यार्थी या शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रात्र ठरले होते. ओबीसी प्रवर्गातील एकुण ३0 हजार ८0  विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरुन संबंधित विभागाकडे सादर केले होते. समाज कल्याण विभागाला उपलब्ध झालेल्या निधीतून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. मात्र पुरेशी तरतूद नसल्याने अद्यापही ७ हजार ८९२ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. बहुतेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील व हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने त्वरित निधी उपलब्ध करुन दिल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.

विजाभजसाठी ४ कोटी ६0 लाख प्राप्तओबीसीप्रमाणेच २0१५-१६ व २0१६-१७ सत्रात विजाभज प्रवर्गातील ४ हजार २९६ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित होती. यासाठी शासनाकडून ४ कोटी ६0 लाखांचा निधी प्राप्त झाला असून कोषागार कार्यालयाकडे बिले सादर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली. 

ऑनलाइन ऑफलाइनचा घोळशासनाच्या नियमानुसार पात्र विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरुन घेतले जात होते. २0१७-१८ सत्रासाठी अनेक विद्यार्थ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरले. मात्र अचानक हे संकेतस्थळ बंद पडल्याने विद्यार्थ्यांंना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे समाज कल्याणकडून पुन्हा ऑफलाइन अर्ज भरुन घेतले जात असल्याने विद्यार्थी गोंधळात पडले.

शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. प्रलंबित असलेल्या ओबीसी शिष्यवृत्तीसाठी आवश्यक ६ कोटी १५ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी मिळताच विद्यार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. -मनोज मेरतप्रभारी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलडाणा 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी