शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

बुलडाणा लोकसभा निवडणूक निकाल 2019:   शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी घेतली आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 09:31 IST

Buldhana Lok Sabha Election Results 2019

बुलडाणा: गत विस वषार्पासून शिवसेनाचा बालेकिल्ला असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात यंदा दुहेरी लढत झाली. वचित बहुजन आघाडीचे आ. बळीराम सिरस्कार यांनीही या निवडणुकीत चांगली  टक्कर दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून बुलडाण्यामध्ये  पहिल्या फेरीनंतर प्रतापराव जाधव यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ३४१४ मतं मिळाली असून, राजेंद्र शिंगणे यांच्या पारड्यात २८५२  मतं पडली आहेत.

१९९६ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने १९९६ मध्ये प्रथमच विजय मिळविल्यानंतर काँग्रेसचे प्राबल्य कमी झाले. १९९८  मध्ये काँग्रेसने येथे विजय मिळविला होता. त्यानंतर काँग्रेसला येथे यश मिळविता आले नाही. २००९ मध्ये पुनर्रचनेनंतर बुलडाणा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. मात्र त्यांना येथे अद्याप एकदाही विजय मिळविता आलेला नाही. मतविभाजनाचा युतीच्या उमेदवारांनी येथे सातत्याने फायदा घेतला आहे. २०१९ च्या लढतीमधील तुल्यबळ प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रतापराव जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे तब्बल दहा वषार्नंतर आमने सामने आहेत. २००९ मध्ये डॉ. शिंगणेंचा शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीचेच कृष्णराव इंगळे यांचा पराभव करून प्रतापराव जाधव हे दुसर्यांदा खासदार झाले होते. त्यामुळे यंदा १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००९ मधील जुने खेळाडू नव्याने डाव टाकत आपले भाग्य आजमावत आहे. त्यामुळे जुन्या खेळाडूंच्या नव्या डावपेचात यंदा कोण बाजी मारते याबाबत उत्सूकता आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचीही बुलडाणा  लोकसभेतील ताकद स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा निकाल जाणून घेण्याची उत्सूकता सर्वसामान्यांना लागली आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील युती विरुद्ध आघाडीच्या लढतीचा निकाल जिल्ह्याचे येत्या दहा ते १५ वषार्तील राजकीय ध्रुविकरण स्पष्ट करणारा ठरणार आहे. 

टॅग्स :buldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस